मिरचीनंतर टोमॅटोचेही भाव कोसळले

By Admin | Updated: September 30, 2016 01:16 IST2016-09-30T00:56:18+5:302016-09-30T01:16:26+5:30

केदारखेडा : मिरचीप्रमाणेच टोमॅटोचे भाव कोसळले आहेत. बाजारात बेभावाने मागणी होत असल्याने शेतकऱ्यांनी गुरूवारी चक्क पुर्णा नदीत टोमॅटो फेकून दिले.

After tomato, the prices of tomatoes collapsed | मिरचीनंतर टोमॅटोचेही भाव कोसळले

मिरचीनंतर टोमॅटोचेही भाव कोसळले


केदारखेडा : मिरचीप्रमाणेच टोमॅटोचे भाव कोसळले आहेत. बाजारात बेभावाने मागणी होत असल्याने शेतकऱ्यांनी गुरूवारी चक्क पुर्णा नदीत टोमॅटो फेकून दिले.
केदारखेडा आठवडी बाजाराला लागुन २० खेडी आहेत. परिसरातील शेतकऱ्यांनी सकाळी टोमॅटो बाजारात विक्रीसाठी आणले होते. परंतु व्यापाऱ्यांनी प्रतिकिलो केवळ एक रूपयाने मागणी केली. पदरी काहीच पडत नसल्याने संतापलेल्या शेतकऱ्यांनी टोमॅटोचे भरलेले ट्रे जवळीलच पुर्णा नदी पात्रात फेकुन दिले़ शेतकऱ्यांच्या मिरची पाठोपाठ टोमॅटोचेही भाव गडगडल्याने शेतकऱ्यांचे हाल होत आहेत.
दोन हजार किलो टोमॅटो दान
वालसा खालसा येथील अशोक सांडु जाधव या शेतकऱ्याने दोन हजार किलो टोमॅटो चागंला मिळेल या अशेने खामगाव येथे नेले होते़ परंतु येथेही बेभावाने खरेदी केली जात असल्याचे दिसताच त्यांनी शेगाव संस्थेला टोमॅटो दान कले. यावेळी त्यांना वाहन भाडेही खिशातून द्यावे लागले.

Web Title: After tomato, the prices of tomatoes collapsed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.