शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
3
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
4
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
5
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
6
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
7
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
8
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
9
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
10
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
11
जीएसबी सेवा मंडळाचा ४७४ कोटींचा विमा; यामध्ये भाविकांचाही समावेश, एसीमध्ये दर्शन मिळणार
12
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
13
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
14
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
15
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
16
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
17
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
18
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
19
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
20
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं

‘शेततळे’ असूनही अखेर बागांनी ‘दम’ तोडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2019 00:35 IST

काही शेतकऱ्यांकडे ‘शेततळे’ असूनही फळ बागांनी ‘दम’ तोडल्याने शेतकरी हताश झाले आहेत. अहोरात्र मेहनत करून जोपासलेल्या बागा ऐन उत्पन्नाच्या वयात जळाल्याने शेतकऱ्यांचे चेहरे चिंतेन काळवंडले आहेत.

ठळक मुद्दे६० टक्के फळबागा नष्ट : कमी पावसामुळे तळ्यांनाच मिळाले नाही पाणी, बहरात आलेल्या फळबागा ऐनवेळी जळाल्या

परतूर : काही शेतकऱ्यांकडे ‘शेततळे’ असूनही फळ बागांनी ‘दम’ तोडल्याने शेतकरी हताश झाले आहेत. अहोरात्र मेहनत करून जोपासलेल्या बागा ऐन उत्पन्नाच्या वयात जळाल्याने शेतकऱ्यांचे चेहरे चिंतेन काळवंडले आहेत.परतूर तालुक्यात कधी नव्हे ते यावर्षी पाण्याचे मोठे दुर्भिक्ष्य जाणवले. विहिरी, बोअर, शेततळी आटली. नवीन बोअर, विहीर घेवूनही पाणी लागले नाही. पाणी पातळी कमालीची घटल्याने पक्के पाणी असलेले जलस्त्रोत हबकले. यामुळे बगायती क्षेत्र धोक्यात आले. काही शेतकरी टँकरने पाणी देवून, शेततळे, ठिबकसह विविध उपाय योजना करून आपल्या बागा आतापर्यंत शेतकºयांनी जोपसल्या. प्रत्येक उन्हाळ््यात शेतकरी पाण्याचे व्यवस्थापण करून आपली बाग जगवतोच, मात्र, या वर्षी शेतकºयांना कडाक्याचे ऊन व पाण्याची अडचण यापुढे हात टेकावे लागले. अनेक उपाय व खर्च करूनही फळबागा जगवता आल्या नाही. घटलेली पाणी पातळी व वाढलेली उन्हाची तिव्रता त्यामुळे थोडे फार पाणी दिले तरी, दुसºयाच दिवशी झाडाचे आळे कोरडे पडू लागले तर, उन्हाच्या तिव्रतेने झाडाची पाने करपू लागली. काही शेतकºयांनी मोसंबी, संत्रा, चिकू या बागा उन्हाळ््यात जगवण्यासाठी शेततळ््यांची व्यवस्था केली आहे. यामध्ये प्लास्टीक तळे प्रभावी ठरले. दरवर्षी हे शेततळे या बागा उन्हाळ््यात जगविण्यासाठी चांगला हातभार लावतात. मात्र, या वर्षी पाण्याचे एवढे दुर्भिक्ष्य निर्माण झाले की, ही तळीच तहानलेली राहीली. या तळ््यात भरपूर पाणी सोडता आले नाही, व जे थोडे बहूत पाणी तळ््यात साठवलेले पाणी या बागांना वाचवू शकले नाही. त्यामुळे दरवर्शी तालुक्यातील कमी होत जाणारे हे मोसंबी, संत्री व ईतर फळ बागाचेही क्षेत्र या वर्षी मोठ्या प्रमाणात घटले आहे.एकेकाळी या परीसरात हजारो एक्करवर फळबागा डोलत होत्या. उत्पन्नही भरघोस व्हायचे मात्र पावसाचे घटत जाणारे प्रमाण व उन्हाची वाढत जाणारी तिव्रता यामुळे फळबागांची शेती आता शेवटच्या घटका मोजत आहे. दरवर्षी फळबागांना उन्हाळ््यात तारणारे शेततळेही यावर्षी तहानलेले राहील्याने जवळपास साठ टक्के फळबागांनी दम तोडला असल्याचे चित्र आहे.

टॅग्स :Jalanaजालनाdroughtदुष्काळwater shortageपाणीटंचाईAgriculture Sectorशेती क्षेत्र