जनजागृती राबवल्यानंतर जिल्ह्यात मतदानाचा टक्का वाढला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:00 IST2021-02-05T08:00:28+5:302021-02-05T08:00:28+5:30
जालना : जास्तीतजास्त लोकांनी मतदानाचा हक्क बजवावा, यासाठी निवडणूक विभागाकडून मोठ्या प्रमाणात जनजागृती केली जाते. त्यामुळेच जालना जिल्ह्यात लोकसभा ...

जनजागृती राबवल्यानंतर जिल्ह्यात मतदानाचा टक्का वाढला
जालना : जास्तीतजास्त लोकांनी मतदानाचा हक्क बजवावा, यासाठी निवडणूक विभागाकडून मोठ्या प्रमाणात जनजागृती केली जाते. त्यामुळेच जालना जिल्ह्यात लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत ग्रामपंचायत निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढला आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत तब्बल ८२ टक्के मतदान झाले.
निवडणूक आयोगाकडून मतदानाचा टक्का वाढावा, यासाठी दरवर्षी जनजागृती केली जाते. यात विविध स्पर्धांचे आयोजन, पोस्टर आदी उपक्रम घेऊन जनजागृती केली जाते. जिल्ह्यातही जिल्हा प्रशासनाच्या वतीने जनजागृती करण्यात आली. त्यामुळे लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत जालना जिल्ह्यात ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढला आहे. जिल्ह्यातील ४४६ ग्रामपंचायतींची नुकतीच निवडणूक पार पडली. या निवडणुकीत मतदारांनी मोठ्या प्रमाणात मतदान केले. त्यामुळेच ग्रामपंचायत निवडणुकीत जिल्ह्यात तब्बल ८२ टक्के मतदान झाले.
ग्रामपंचायतींसाठी मतदान
ग्रामपंचायतींचे उमेदवार आपली सत्ता येण्यासाठी प्रत्येक मतदाराला मतदानासाठी नेतात. त्यामुळेच ग्रामपंचायत निवडणुकीत मोठ्या प्रमाणात मतदान झाले.