शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांना कशाला घेता, आम्हीच तुमच्यासोबत येतो; उद्धव ठाकरेंचा दिल्लीला फोन'; शिंदेंचा गौप्यस्फोट
2
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
3
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
4
अमेठीमध्ये बसपाने उतरवला उमेदवार? भाजपा की काँग्रेस, कुणाचं गणित बिघडवणार?  
5
महाराष्ट्रात सहानुभूती आमच्या बाजूने, कारण...; PM मोदींनी दिला वेगळाच 'अँगल'
6
PHOTOS: IPS पदाचा राजीनामा देऊन लोकसभेच्या 'रिंगणात', सामाजिक कार्यासाठी मैदानात!
7
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
8
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी लावा नवीन तुळस; होतील अगणित फायदे!
9
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
10
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे
11
अभिनेता लोकसभेच्या रिंगणात; चाहत्याची सेल्फी अन् झाले मोठे नुकसान, पिकला एकच हशा
12
खळबळजनक! लग्नानंतर 4 दिवसांनी नवरीचा मृत्यू; बाथरूममध्ये सापडला मृतदेह अन्...
13
'मोदी तुमच्या आरक्षणाचे रक्षण करेल; सर्वाधिक ST खासदार भाजपचे', PM मोदींची काँग्रेसवर टीका
14
Narendra Modi : "आरक्षण रद्द करण्याचा मार्ग आम्हाला कदापि मंजूर नाही", मोदी यांची सोलापुरात स्पष्टोक्ती
15
'घरच्यांना सांग सुखरुप निघालो', राज ठाकरे संकर्षणला असं का म्हणाले? 'त्या' कवितेनंतर घेतली भेट
16
'३ इडियट्स'मधील रँचोच्या भूमिकेसाठी आमिर खान नव्हता पहिली पसंती, सिनेमा नाकारल्याचं अभिनेत्याला होतोय पश्चाताप
17
Ana Brumwell Photos: कोण आहे RCBचा शतकवीर Will Jacksची गर्लफ्रेंड अ‍ॅना ब्रुमवेल? जाणून घ्या या सौंदर्यवतीबद्दल
18
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य
19
“औरंगजेब-याकुबचा उदो उदो करण्यापेक्षा रामराम करणे कधीही चांगले”; बावनकुळेंची ठाकरेंवर टीका
20
Rahul Gandhi : "कोणत्याही महिलेला मंगळसूत्र गहाण ठेवावं लागणार नाही"; राहुल गांधींचं 25 लाखांचं आश्वासन

९ तासानंतर पोलिसांनी फरार आरोपीला पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 4:29 AM

चंदनझिरा (जि.जालना) : पाणी पिण्याचा बहाणा करून पोलीस ठाण्यातून फरार झालेला खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीस नऊ तासानंतर जेरबंद करण्यास पोलिसांना ...

चंदनझिरा (जि.जालना) : पाणी पिण्याचा बहाणा करून पोलीस ठाण्यातून फरार झालेला खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीस नऊ तासानंतर जेरबंद करण्यास पोलिसांना शुक्रवारी रात्री उशिरा यश आले आहे. श्याम ऊर्फ रमेश चिकटे (२७, रा. चंदनझिरा) असे आरोपीचे नाव असून, त्याला पोलिसांनी इंदेवाडी येथून ताब्यात घेतले आहे.

जालना शहरातील लक्ष्मण उंबरे यांचा गुरूवारी दुपारी श्याम चिकटे व जितेंद्र आरसूळ यांनी खून केला होता. खून केल्यानंतर दोघेही घटनास्थळावरून फरार झाले होते. शुक्रवारी दुपारी दोघांनाही ताब्यात घेऊन न्यायालयात हजर केले असता, सहा दिवसांची पोलीस काेठडी सुनावण्यात आली होती. त्यानंतर त्यांना चंदनझिरा पोलीस ठाण्यात ठेवण्यात आले होते. यातील श्याम ऊर्फ रमेश चिकटे याने पाणी पिण्याचा बहाणा करून पोलीस ठाण्यातून पळ काढला. या घटनेमुळे खळबळ उडाली होती. पोलीस ठाण्यातून फरार झालेल्या आरोपीला तातडीने ताब्यात घेण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर होते. पोलिसांनी सदरील आरोपीचा माग काढत त्याला इंदेवाडी येथून ताब्यात घेतले. ही कामगिरी पोलीस निरीक्षक यशवंत जाधव, सपोनि. संदीप सावळे, पोलीस उपनिरीक्षक प्रमोद बोंडले, पोलीस कर्मचारी साई पवार, अनिल काळे, नंदलाल ठाकूर, चंद्रकांत माळी आदींनी केली आहे.