३७ वर्षानंतर माजी विद्यार्थी आले एकत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:01 IST2021-02-05T08:01:24+5:302021-02-05T08:01:24+5:30
भोकरदन : येथील जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये १९८६-८७ साली इयत्ता दहावीचे शिक्षण पूर्ण केलेले वर्गमित्र रविवारी आयोजित स्नेहमिलन ...

३७ वर्षानंतर माजी विद्यार्थी आले एकत्र
भोकरदन : येथील जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये १९८६-८७ साली इयत्ता दहावीचे शिक्षण पूर्ण केलेले वर्गमित्र रविवारी आयोजित स्नेहमिलन कार्यक्रमात ३७ वर्षांनी एकत्र आले. हा कार्यक्रम येथील रत्नमाला लॉन्समध्ये पार पडला.
आपल्या दहावीच्या सर्व मित्रांना एकत्र आणण्यासाठी सुनील घायवट व शैला देशमुख यांनी व्हाट्सअप ग्रुप तयार केला. त्यानंतर सर्वांना स्नेहमिलन कार्यक्रमाचे निमंत्रण दिले. रत्नमाला लॉन्समध्ये पार पडलेल्या या कार्यक्रमात जवळपास वयाची पन्नासी ओलांडलेले सर्व मित्र- मैत्रिणी पोहोचले होते. एकमेंकांना बघून ते आनंदाने भारावून गेले. प्रत्येकाने आपल्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी शैला देशमुख, लता शेवाळे, जयमाला तायडे, सुवर्णा चौधरी, लता सोनटक्के, सुनिल घायवट, सोपान सपकाळ, सूर्यकांत पाटील, संजय पिसे, सुनील पगारे, काशिनाथ तळेकर, सुरेश बोर्डे, उदय खोत, मनोज प्रसाद, मिलिंंद पगारे, अशोक घायवट, संजय साळवे, अनिल राजपूत, गोविंद डोभाळ, गंगाधर मैंद, राजू पगारे, कैलास लांडगे आदींची उपस्थिती होती.