अवैध वृक्षतोडीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:31 IST2021-05-20T04:31:54+5:302021-05-20T04:31:54+5:30
परिचारिकांचा सत्कार मंठा : जागतिक परिचारिका दिनानिमित्त शहरातील ग्रामीण रूग्णालयात कार्यरत परिचारिकांचा माजी उपनगराध्यक्ष बाळासाहेब बोराडे यांच्या हस्ते सत्कार ...

अवैध वृक्षतोडीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष
परिचारिकांचा सत्कार
मंठा : जागतिक परिचारिका दिनानिमित्त शहरातील ग्रामीण रूग्णालयात कार्यरत परिचारिकांचा माजी उपनगराध्यक्ष बाळासाहेब बोराडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी अरूण वाघमारे, अशोक अवचार, ॲड. सिद्धार्थ अवसरमोल, सुरेश वाव्हळे, गजानन बोराडे, शिरीष बोराडे आदींची उपस्थिती होती.
रामेश्वर तांडा येथे २३५ जणांचे लसीकरण
जालना : तालुक्यातील रामेश्वर तांडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत लसीकरण मोहीम घेण्यात आली. या शिबिरात तब्बल १३५ नागरिकांनी लसीकरण करून घेतले. या शिबिरासाठी ग्रामपंचायत सरपंच विनोद राठोड, ग्रामसेविका जया पवार, उपसरपंच सुधाकर खंडागळे, दिलीप राठोड, गोरे, लांडगे तसेच सेवली प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉ. कुलकर्णी, डॉ. देशमाने आदींनी परिश्रम घेतले.
अवजड वाहनांचा शहरामध्ये प्रवेश
जालना : शहरांतर्गत बाजारपेठेत अवजड वाहनांचा प्रवेश सुरूच आहे. अवजड वाहनांमुळे वाहतूक कोंडी होत असून, अपघाताचा धोका वाढला आहे. शिवाय ही वाहने शहरांतर्गत मुख्य मार्गावरही प्रवेश करीत आहेत. त्यामुळे शहर वाहतूक शाखेने अवजड वाहनांना दिवसा शहरातील प्रवेशबंदी कायम करावी, अशी मागणी शहरातील नागरिकांसह वाहनधारकांमधून केली जात आहे.
राजवाडीत मंगळवारी तपासणी शिबिर
जालना : तालुक्यातील राजवाडी येथे मंगळवारी घेण्यात आलेल्या आरोग्य शिबिरात ग्रामस्थांची कोरोनाची चाचणी करण्यात आली. यावेळी सरपंच शिवहरी शेवाळे, ग्रामसेवक आर. एस. वाव्हळे, तलाठी सुरेश बाबर, माजी सरपंच रंगनाथ शेवाळे, व्हाईस चेअरमन भास्कर शेवाळे, शिवाजी काष्टे, राजेभाऊ शेवाळे, उपस्थित होते.
अतिक्रमणामुळे वाहतुकीस अडथळा
जालना : शहरातील मोतीबागेकडे जाणाऱ्या व औद्योगिक वसाहतीत येण्यासाठी असलेल्या जयभवानी चौकात अतिक्रमण झाले आहे. यामुळे वारंवार अपघात होत आहेत. याशिवाय औद्योगिक वसाहतीतून येणारी मोठमोठी वाहने बाहेर काढताना चालकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.