कोरोनाला रोखण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेने कामाला लगावे - पवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2021 04:19 IST2021-02-22T04:19:38+5:302021-02-22T04:19:38+5:30
तीर्थपुरी : गेल्या आठ ते दहा दिवसांपासून घनसावंगी तालुक्यासह जालना जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून, या रुग्णसंख्येला ...

कोरोनाला रोखण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेने कामाला लगावे - पवार
तीर्थपुरी : गेल्या आठ ते दहा दिवसांपासून घनसावंगी तालुक्यासह जालना जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून, या रुग्णसंख्येला आळा घालण्यासाठी सर्व प्रशासकीय यंत्रणेने सतर्कता बाळगून कामाला लागावे, अशा सूचना जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष महेंद्र पवार यांनी दिल्या. शुक्रवारी तीर्थपुरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात बैठक घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. या प्रसंगी कैलास अंडील, पंचायत समितीचे सभापती भागवत रक्ताटे, उपसभापती बन्सीधर शेळके, जिल्हा आरोग्य अधिकारी संतोष कडले यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी डॉक्टर, अंगणवाडीसेविका, आरोग्यसेवक-सेविका, आशा वर्कर यांना प्रमुख पदाधिकाऱ्यांनी कोरोनाला पायबंद घालण्यासाठी तत्पर कामाला लागण्याच्या सूचना दिल्या. कोरोनाची दुसरी लाट मोठ्या प्रमाणात पसरत असूूून, गेल्या आठ ते दहा दिवसांत रुग्ण वाढीचा वेग दुप्पट-तिप्पट होत असून, मोठ्या प्रमाणात रुग्ण वाढल्यामुळे आरोग्य यंत्रणेवरचा ताण वाढत आहे. याचे स्वरूप लक्षात घेऊन नागरिकांनीही मास्क व सॅनिटायझरचा वापर वाढवून सुरक्षित अंतर पाळण्याला प्राधान्य देण्याचे, तसेच पोलीस प्रशासनाने १४४ कलमाची योग्य अंमलबजावणी करून गर्दी होणार नाही, याची दक्षता घेण्याचे आवाहन करून ग्रामपंचायत, नगरपालिका, नगरपंचायत आदी संस्थांनी आपापल्या क्षेत्रांमध्ये कोरोना प्रतिबंधित नियमाचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन केले. यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ.किशोर नाटकर, डाॅ.सुमेरा सिद्धीकी, डॉ.रोहिणी भागवत, डॉ.पूनम गिराम, केवल लिपटकर, प्रणिता मिसाळ, डॉ.उदय दहिभाते, डॉ.अंजुम शेख, डॉ.स्वप्निल लहाने, अशोक शिंदे, भरत साबळे, परविन शेख, ज्ञानेश्वर मोरे आदी उपस्थित होते.
===Photopath===
210221\21jan_23_21022021_15.jpg
===Caption===
प्राथमिक आरोग्य केंद्रात आयाेजित बैठकीत मार्गदर्शन करण्यात आले.