शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

...तर आगामी अधिवेशनापर्यंत राज्यपाल बदलून दाखवा; आदित्य ठाकरेंचे सरकारला थेट चॅलेंज

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2023 15:40 IST

'आमच्या काळात शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली, उद्योग राज्यात आणले पण कधी दिखावा केला नाही.'

दिलीप सारडा बदनापूर - महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी आगामी अधिवेशनापर्यंत महाराष्ट्राचे राज्यपाल बदलून दाखवावेत, असे जाहीर आव्हान माजी मंत्री तथा युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केले. बदनापूर तालुक्यातील सोमठाणा येथे आज(दि. 8) आदित्य ठाकरे यांनी ग्रामस्थांसोबत संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, मी मुख्यमंत्र्यांना चॅलेंज देत असून आगामी अधिवेशनात राज्यपाल म्हणून तिथे भाषण करायला येतील ते नवीन राज्यपाल आणून दाखवा.

आदित्य ठाकरे पुढे म्हणाले की, राज्यपाल स्वतः म्हणतात की मला इथे राहण्याची इच्छा नाही. आता मुख्यमंत्र्यांनी केंद्राला सांगावे आणि राज्याताल नवीन राज्यपाल मिळवून द्यावेत. आज राज्यामध्ये शेतकरी खुश नाही, महिला खुश नाही. सध्याचे राज्यात घटनाबाह्य सरकार असून हे सरकार पडणार म्हणजे पडणारच. आज कोर्टात केस चालू आहे, ज्या मिनिटाला संविधानात्मक निकाल येईल, त्यावेळी हे सरकार पडेल. सत्ता कोणाची असो परंतु सत्यासमोर सत्ता जायला वेळ लागत नाही, अशी टीका त्यांनी केली.

अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे राज्यात शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना मदत मिळालेली नाही. दोन सरकारमध्ये फरक हाच असतो. आमचे सरकार आले तेव्हा मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना कर्जमुक्ती प्रथम द्यायची, असा निर्धार केला होता व त्याप्रमाणे दोन लाखापर्यंत सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली. आताच्या सरकारने प्रचंड अटी शर्ती लावून शेतकऱ्यांना मदत दिली. आम्ही आमचे कर्तव्य म्हणून हे काम केले. याचा गाजावाजा करण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी होल्डिंग लावले नाही , असंही आदित्य म्हणाले.

ते पुढे म्हणतात, महाराष्ट्रात नवीन उद्योग येईना, रोजगार मिळेना. ज्या उद्योगाला आम्ही राज्यात आणण्यासाठी मंजुरी दिली होती तो उद्योग गुजरातमध्ये गेला. ते म्हणतात की, स्वित्झर्लंडमधील डावोसमध्ये जाऊन 80 हजार कोटीची परदेशी गुंतवणूक आणली. पण, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते तेव्हा साडेसहा लाख कोटींची गुंतवणूक आपल्या राज्यामध्ये आणली. आम्ही बोलून नव्हे तर करून दाखवलं आणि दुसऱ्या बाजूला हे मुख्यमंत्री अठ्ठावीस तासांसाठी डावोसला जाऊन चाळीस कोटी खर्च करुन येतात, असा घणाघातही आदित्य यांनी केला. 

 

टॅग्स :Aditya Thackreyआदित्य ठाकरेBJPभाजपाEknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरेJalanaजालना