महिला रुग्णालयासाठी अतिरिक्त ४० खाटांना मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2019 00:53 IST2019-02-22T00:53:02+5:302019-02-22T00:53:24+5:30

जिल्हा स्त्री रुग्णालयासाठी अतिरिक्त ४० खाटांना मंजुरी देण्यासह वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या रिक्त जागा त्वरित भरण्यासाठी मान्यता मिळाली आहे.

Additional 40 beds for women hospital | महिला रुग्णालयासाठी अतिरिक्त ४० खाटांना मंजुरी

महिला रुग्णालयासाठी अतिरिक्त ४० खाटांना मंजुरी

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : येथील जिल्हा स्त्री रुग्णालयासाठी अतिरिक्त ४० खाटांना मंजुरी देण्यासह वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या रिक्त जागा त्वरित भरण्यासाठी मान्यता मिळाली आहे.
गुरुवारी मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सभागृहात शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक घेण्यात आली. याप्रसंगी आरोग्य मंत्री एकनाथ शिंदे, राज्यमंत्री अर्जुन खोतकर, भास्कर अंबेकर, आरोग्य संचालक आयुक्त डॉ. अनुप कुमार यादव यांच्यासह आदींची उपस्थिती होती.
जिल्हा स्त्री रुग्णालयाचा लोकार्पण सोहळा ३ फेब्रुवारी रोजी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत पार पडला होता. यावेळी स्त्री रुग्णालयामध्ये येणा-या महिला रुग्णांची गर्दी लक्षात घेता खाटांची संख्या वाढविणे, येथील रिक्तपदे भरणे आवश्यक असल्याचे त्यांच्या लक्षात आणून दिले होते.
दरम्यान, गुरुवारी त्यांनी बैठक बोलवून स्त्री रुग्णालयाला अतिरिक्त ४० खाटांची मान्यता व अधिकारी व कर्मचा-यांच्या रिक्त जागा भरण्याचे आदेश दिले. तसेच २०० खाटाच्या प्रस्तावित मनोरुग्णालयाच्या कामास गती देण्याच्या सूचनाही करण्यात आल्या. व त्याबाबतचा प्रस्ताव सादर करण्याचा आदेश सबंधितांना देण्यात आले.

Web Title: Additional 40 beds for women hospital