देऊळगाव राजा येथे अंधारातून प्रकाशाकडे उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:03 IST2021-02-05T08:03:54+5:302021-02-05T08:03:54+5:30
शहरातील संतोष चित्रमंदिर चौकात प्रथम इस्लामिक मराठी पब्लिकेशन मुंबई च्या फिरत्या व्हॅन मधील पुस्तकालयाचे उद्घाटन प्राचार्य डॉ. गजानन जाधव ...

देऊळगाव राजा येथे अंधारातून प्रकाशाकडे उपक्रम
शहरातील संतोष चित्रमंदिर चौकात प्रथम इस्लामिक मराठी पब्लिकेशन मुंबई च्या फिरत्या व्हॅन मधील पुस्तकालयाचे उद्घाटन प्राचार्य डॉ. गजानन जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी उपनगराध्यक्ष पवन झोरे, गटनेत्या सुनीता सवडे यांची प्रमुख उपस्थिती होती. संघटनेचे शहराध्यक्ष शेख लुकमान यांनी प्रास्ताविक करताना इस्लाम धर्म, कुरान व पैगंबर मोहम्मद (सल.) यांच्या शिकवणीबाबत माहिती दिली. कुराण हा ग्रंथ संपूर्ण मानवजातीसाठी मार्गदर्शन करतो. आपण सर्व एकच आई-वडिलांची संतती असल्याने आपले रक्ताचे नाते आहे. पवित्र ग्रंथ कुराण यातून ईश्वराचा संदेश समजून घेण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. प्रा.मुडे यांनीही मार्गदर्शन केले. कार्यक्रमासाठी मोहम्मद अजीमोद्दिन, मोहम्मद सईद, फिरोज खान, नसीर खान पठाण, मुशीरखान कोटकर इस्लामिक मराठी पब्लिकेशनचे शेख मुसा आदींनी परिश्रम घेतले.
कॅप्शन : देऊळगाव राजा येथे मार्गदर्शन करताना प्रसिद्ध व्याख्याते प्रा. श्याम मुडे.