रस्त्यावर वाहने उभी करणा-या ७० वाहनधारकांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 04:23 IST2021-01-10T04:23:37+5:302021-01-10T04:23:37+5:30

पोलिसांची मोहीम ; १६ हजार रूपयांचा दंड केला वसूल भोकरदन : भोकरदन शहरातील रस्त्यावर वाहने उभे करणा-यांवर भोकरदन पोलिसांकडून ...

Action taken against 70 vehicle owners who parked their vehicles on the road | रस्त्यावर वाहने उभी करणा-या ७० वाहनधारकांवर कारवाई

रस्त्यावर वाहने उभी करणा-या ७० वाहनधारकांवर कारवाई

पोलिसांची मोहीम ; १६ हजार रूपयांचा दंड केला वसूल

भोकरदन : भोकरदन शहरातील रस्त्यावर वाहने उभे करणा-यांवर भोकरदन पोलिसांकडून कारवाई केली जात आहे. मागील दोन दिवसांत ७० वाहनधारकांवर कारवाई करण्यात आली असून, त्यांच्याकडून १६ हजार रूपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

शहरातील भोकरदन - सिल्लोड, भोकरदन -जाफराबाद व भोकरदन -जालना या रस्त्यांवर वाहनधारक कोठेही वाहने उभी करीत होते. यामुळे वाहतुकीचा खोळंबा होत होता. बेशिस्त वाहने उभी करणाºया वाहनधारकांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली होती. त्यानुसार पोलीस निरीक्षक चर्त्रुभुज काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली बेशिस्त वाहनधारकांवर कारवाई केली जात आहे. नगर परिषदेच्या सहकार्याने पोलीस उपनिरीक्षक भागवत नागरगोजे यांच्यासह १० ते १५ कर्मचारी दोन दिवसांपासून कारवाई करीत आहे. वाहन चालकांबरोबरच रस्त्यावर बोर्ड उभे करणा-या व्यापा-यांवरही कारवाई केली जात आहे. आतापर्यंत ७० वाहनधारकांकडून १६ हजार रूपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. दरम्यान, भोकरदन शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, सराफा मार्केट, जाफराबाद रोड, सिल्लोड रोड, महात्मा फुले चौक येथे मोठ्या प्रमाणात वाहने रस्त्यावर उभी केली जात असल्याने वाहतूक कोंडी होते. येथील वाहनधारकांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

शहरातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलीस व नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने कारवाईची मोहीम हाती घेण्यात आली आहे. आतापर्यंत ७० वाहनधारकांकडून १६ हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे. वाहनधारकांनी रस्त्यावर वाहने उभी करू नये.

चर्त्रुभुज काकडे, पोनि. भोकरदन

फोटो ओळी

भोकरदन शहरातील रस्त्यावर बेशिस्त उभी केलेली वाहने उचलून नेताना पोलीस .

Web Title: Action taken against 70 vehicle owners who parked their vehicles on the road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.