शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
2
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
3
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
4
...तर पक्ष तेव्हाच फुटला असता; शरद पवारांच्या दाव्यावर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
5
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
6
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
7
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
8
शेतातील ५० लाख झाडांवर कुऱ्हाड! अधिक पिकांसाठी जमीन हवी म्हणून तोडली झाडे - अहवाल 
9
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
10
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
11
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
12
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
13
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
14
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
15
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
16
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
17
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
18
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
19
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
20
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू

पाणीपुरवठ्यासाठी २१० विहिरींचे अधिग्रहण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2018 1:11 AM

वाढत्या उन्हाच्या तीव्रतेमुळे विहिरींची पाणीपातळी झपाट्याने खालावत आहे. परिणामी अनेक गावांमध्ये पाणीटंचाई निर्माण झाली आहे. टंचाई निवारणार्थ प्रशासनाकडून ५९ गावांसह आठ वाड्यांमध्ये ६८ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू असून, २१० विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिल्ह्यात वाढत्या उन्हाच्या तीव्रतेमुळे विहिरींची पाणीपातळी झपाट्याने खालावत आहे. परिणामी अनेक गावांमध्ये पाणीटंचाई निर्माण झाली आहे. टंचाई निवारणार्थ प्रशासनाकडून ५९ गावांसह आठ वाड्यांमध्ये ६८ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू असून, २१० विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे.जिल्ह्यात उन्हाचा पारा ४१ अंशांवर पोहोचला आहे. त्यामुळे जलस्त्रोतांमधील पाणी आटत आहे. याचा परिणाम ग्रामीण भागातील पाणीपुरवठ्यावही झाला आहे.अनेक गावांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. काही ठिकाणी महिलांना दूरच्या विहिरीवरून शेंदून पाणी आणावे लागत आहे. पाणीटंचाई जाणवत असलेल्या ५९ गावांसह आठ वाड्यांमध्ये जिल्हा प्रशासनाने टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू केला आहे. भोकरदन व जाफराबाद तालुक्यात सर्वाधिक टंचाईग्रस्त गावे आहेत. तुलनेत जालना, बदनापूर, घनसावंगी तालुक्यात टंचाईग्रस्त गावांची संख्या कमी आहे. अंबड आणि मंठा तालुक्यातील एकाही गावात सध्या तरी टंचाईसदृश्य परिस्थिती नसल्याने एकही टँकर सुरू करण्यात आलेले नाही. सध्या जिल्ह्यात ५९ गावे व आठ वाड्यांसाठी १९ शासकीय तसेच ४९ खाजगी, अशा एकून ६८ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. टँकर भरण्यसाठी ६५ व टँकरव्यतिरिक्त पाणीपुरवठ्यासाठी १४५ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. उन्हाच्या वाढत्या तीव्रतेमुळे येत्या काही दिवसात टंचाईग्रस्त गावांच्या संख्येत भर पडण्याची शक्यता आहे.२४ तासांत टँकरद्वारे पाणीपुरवठ्याच्या सूचनापिण्याच्या पाण्याचे कोणतेही स्त्रोत नसलेल्या टंचाईग्रस्त गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठ्यासाठी सरपंचांनी प्रस्ताव सादर केल्यापासून २४ तासात टँकरने पाणीपुरवठा करण्याच्या सूचना पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत. कामात हयगय केल्यास कडक कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाईBabanrao Looneykarबबनराव लोणीकर