घरफोडीतील आरोपी गुन्हे शाखेच्या ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:04 IST2021-02-05T08:04:21+5:302021-02-05T08:04:21+5:30
आरोपीचा जामीन न्यायालयाने फेटाळला जालना : शहरातील व्यापारी दिनेश होलानी यांनी धुळे येथील कंपनीसाठी सय्यद कैसर यांच्या ट्रकमध्ये पाठविलेले ...

घरफोडीतील आरोपी गुन्हे शाखेच्या ताब्यात
आरोपीचा जामीन न्यायालयाने फेटाळला
जालना : शहरातील व्यापारी दिनेश होलानी यांनी धुळे येथील कंपनीसाठी सय्यद कैसर यांच्या ट्रकमध्ये पाठविलेले सोयाबीन कंपनीत गेले नव्हते. या प्रकरणात सय्यद कैसर, राजे खान आदी आरोपींविरूध्द गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणातील आरोपी राजे खान याला अटक करण्यात आली होती. आरोपीचा जामीन अर्ज नामंजूर करण्याची विनंती ॲड. सुबोध किनगावकर यांनी केली होती. न्यायालयाने दोन्ही पक्षांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर आरोपीचा जामीन अर्ज फेळाल्याचे पोलिसांनी सांगितले.
अवैध वाळू उत्खनन; जेसीबीसह वाहने जप्त
अंबड : तालुक्यातील आलमगाव शिवारातील दुधना नदीत अवैधरीत्या वाळूचा उपसा करणाऱ्यांविरुद्ध शुक्रवारी पहाटेच्या सुमारास पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत एक जेसीबी, दोन टिप्पर असा एकूण ४० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अंबड ठाण्यातील सपोनि. पतंगे व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली. याप्रकरणी अंबड ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.