पेट्रोलिंग करत असताना पोलिसांच्या जीपला अपघात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:30 IST2021-03-31T04:30:43+5:302021-03-31T04:30:43+5:30
जालना- भरधाव स्कार्पिओने रात्रगस्तीवरील पोलिसांच्या जीपला धडक दिल्याची घटना जालना शहराजवळील सिंदखेडराजा रोडवरील दत्तआश्राजवळ सोमवारी साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडली. ...

पेट्रोलिंग करत असताना पोलिसांच्या जीपला अपघात
जालना- भरधाव स्कार्पिओने रात्रगस्तीवरील पोलिसांच्या जीपला धडक दिल्याची घटना जालना शहराजवळील सिंदखेडराजा रोडवरील दत्तआश्राजवळ सोमवारी साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडली. या अपघातात पोलीस उपनिरीक्षकसह तीन पोलीस कर्मचारी जखमी झाले आहे.
तालुका ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामदास काकडे, कर्मचारी दिगंबर चौरे, उगले, चालक सुभाष नागरे हे जालना शहराकडून तालुका ठाणे हद्दीतील सिंदखेडराजा मार्गाने पेट्रोलिंग करत होते. पोलिसांची गाडी (एमएच.२१.एल ०२४१) दत्तआश्रमाजवळ असताना सिंदखेडराजाकडून येणाऱ्या एका भरधाव स्कार्पिओने (एमएच.२१.एक्स. ३३५८) पोलिसांच्या गाडीसमोर असलेल्या एका दुचाकीला (एमएच.२१.बीआर.०३२८) धडक दिली. त्यानंतर नियंत्रण सुटल्याने स्कार्पिओ विरुध्द दिशेने जाणाऱ्या पोलिसांच्या जीपला जावून धडकली. या अपघातात पोलिसांच्या गाडीतील उपनिरीक्षक रामदास काकडे यांच्यासह कर्मचारी चौरे, उगले, सुभाष नागरे हे जखमी झाले. अपघातात तिन्ही वाहनांचेही मोठे नुकसान झाले. स्कॉर्पिओमधील काही प्रवासी व दुचाकीस्वार सुध्दा जखमी असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, उपनिरीक्षक काकडे यांच्या डोळ्याला मार लागल्यामुळे त्यांना अधिक उपचारासाठी औरंगाबाद येथील एका खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. या प्रकरणी स्कार्पिओ चालकाविरुध्द तालुका ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.