पोकरातील कामांची गती वाढवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:35 IST2021-09-17T04:35:53+5:302021-09-17T04:35:53+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क टेंभुर्णी : पोकरांतर्गत टेंभुर्णी गावात होणारी कृषीविषयक कामे आजही पाहिजे त्या अपेक्षित गतीने होत नाहीत. त्यामुळे ...

पोकरातील कामांची गती वाढवा
लोकमत न्यूज नेटवर्क
टेंभुर्णी : पोकरांतर्गत टेंभुर्णी गावात होणारी कृषीविषयक कामे आजही पाहिजे त्या अपेक्षित गतीने होत नाहीत. त्यामुळे पोकरांतर्गत शेतकऱ्यांनी प्रस्तावित केलेल्या विविध योजनांचा लाभ विहीत वेळेत मिळण्यासाठी प्रशासकीय पातळीवरून या कामांची गती वाढवावी, असा सूर पोकरा समितीच्या बैठकीत सहभागी सदस्यांमधून निघाला.
टेंभुर्णी ग्रामपंचायत कार्यालयाच्या सभागृहात झालेल्या या बैठकीच्या अध्यक्षस्थानी सरपंच सुमन म्हस्के होत्या. पोकरा समितीने प्रस्तावित केलेली अनेक कामे आजही प्रशासकीय स्तरावर प्रलंबित असल्याचे समिती सदस्य भिकनखा पठाण यांच्यासह अनेकांनी सांगितले. यावर समितीचे समूह सहाय्यक बोडखे यांनी सांगितले की, मागील काळात काही कामे रखडली असली तरी सध्या प्रस्तावितांपैकी जवळपास साठ टक्के कामांचा निपटारा करण्यात आला आहे. अन्य कामांसाठीही स्थळ पाहणीसह ऑनलाईन प्रक्रिया युद्धपातळीवर सुरू आहे. एकाच शेतकऱ्यांनी वेगवेगळ्या योजनांंसाठी एकाचवेळी मागणी केल्यानेही पेंडन्सीत वाढ दिसत असल्याचेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, बैठकीत प्रस्तावित सर्व कामांचा लाभ शेतकऱ्यांना त्वरित मिळावा म्हणून जलद कारवाई करण्याची मागणीही सदस्यांनी लावून धरली. या बैठकीला ग्रामविकास अधिकारी सुखदेव शेळके, समिती सदस्य भिकनखा पठाण, गणेश धनवई, माधवराव अंधारे, अंकुश देशमुख, बाबू जाधव, राजू खोत, विष्णू जमधडे, सीताराम खरात, गौतम म्हस्के, संतोष पाचे, संतोष शिंदे आदी उपस्थित होते.