आरती घुगरे यांचा औरंगाबादेत सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:32 IST2021-01-19T04:32:00+5:302021-01-19T04:32:00+5:30
नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई जालना : जालना-मंठा मार्गावर रविवारी मौजपुरी पोलीस व उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने वाहतूक नियम मोडणाऱ्या ...

आरती घुगरे यांचा औरंगाबादेत सत्कार
नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई
जालना : जालना-मंठा मार्गावर रविवारी मौजपुरी पोलीस व उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने वाहतूक नियम मोडणाऱ्या चालकांवर कारवाई करण्यात आली. या पथकाने २७ वाहन चालकांवर कारवाई करून ३५ हजार रुपयांचा दंड वसूल केला. वाहन चालकांवर सातत्याने कारवाई केली जाणार असल्याचे सपोनि. रामोड यांनी सांगितले.
आसनगाव गावामध्ये राज्याभिषेक सोहळा
परतूर : तालुक्यातील आसनगाव येथे छत्रपती संभाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळा दिन साजरा करण्यात आला. यावेळी राजे संभाजी मित्रमंडळाचे अध्यक्ष रामेश्वर खरात, मच्छिंद्र खरात, भागवत खरात, बळीराम खरात, गणेश खरात, गजानन खरात, बाळासाहेब नाटकर, सुरेश खरात, सुभाष खरात, वसंत भिसे, सुमंत भिसे, महारुद्र खरात आदींची उपस्थिती होती.
बदलत्या वातावरणामुळे रब्बीतील पिके धोक्यात
भोकरदन : गत काही दिवसांपासून तालुक्यातील वातावरणात सतत बदल होत आहे. बदलत्या वातावरणामुळे रब्बीतील गहू, ज्वारी, हरभऱ्यासह इतर पिकांना मोठा फटका बसत आहे. त्यामुळे शेतकरी महागडी औषधे फवारणी करीत आहेत. त्यामुळे कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे, अशी मागणी केली जात आहे.