निवडणूक प्रक्रियेसाठी ८५० महसूल तर १५० पोलीस कर्मचारी सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 04:25 IST2021-01-15T04:25:57+5:302021-01-15T04:25:57+5:30

तालुक्यातील ५० ग्रामपंचायतींसाठी ४१८ उमेदवार निवडले जाणार असून, त्यापैकी २८ उमेदवार हे बिनविरोध निवडून आलेले आहेत. सध्या ९०१ उमेदवार ...

850 revenue and 150 police personnel ready for the election process | निवडणूक प्रक्रियेसाठी ८५० महसूल तर १५० पोलीस कर्मचारी सज्ज

निवडणूक प्रक्रियेसाठी ८५० महसूल तर १५० पोलीस कर्मचारी सज्ज

तालुक्यातील ५० ग्रामपंचायतींसाठी ४१८ उमेदवार निवडले जाणार असून, त्यापैकी २८ उमेदवार हे बिनविरोध निवडून आलेले आहेत. सध्या ९०१ उमेदवार निवडणूक रिंगणात असले तरी त्यातील ३९० सदस्यच निवडले जाणार आहेत. त्यात ४७६ महिला उमेदवार तर ४२५ पुरुष उमेदवार आहेत. निवडणूक मतदान प्रक्रियेसाठी एकूण १५६ प्रभाग असणार आहेत. निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी निवडणूक विभागाकडून १० क्षेत्रीय अधिकारी, १५ निवडणूक निर्णय अधिकाºयांसह एकूण ८५० कर्मचारी नियुक्त केले आहेत. कोरोना प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने वैद्यकीय अधिकारी यांना पत्र दिले असून, मतदान केंद्रावर उपाय-योजना करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. कर्मचाºयांची कोरोना चाचणी केली नसली तरी त्यांना मास्कचा वापर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मतदारांनीही मास्क घालूनच मतदान करावे, असे आवाहन तहसीलदार सुमन मोरे यांनी केले.

तर कायदा आणि सुव्यवस्था सुरळीत राहण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून १० पोलीस उपनिरीक्षकांसह १५० पोलीस कॉस्टेबल, लेडीज पोलीस, होमगार्ड यांची नियुक्ती केली आहे. तालुक्यातील केंधळी, अंभोडा कदम आणि पाटोदा ही गावे संवेदनशील असल्यामुळे त्या ठिकाणी पोलीस प्रशासनाचे विशेष लक्ष असणार असल्याचे पोलीस निरीक्षक विलास निकम यांनी सांगितले.

मतदान प्रक्रियेसाठी प्रशासकीय तयारी पूर्ण झालेली असून, त्यासाठी १० क्षेत्रीय अधिकारी, १५ निवडणूक निर्णय अधिकाºयांसह एकुण ८५० अधिकारी कर्मचारी नियुक्त केले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या सर्व नियमांचे पालन करण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या आहे.

सुमन मोरे, तहसीलदार, मंठा.

Web Title: 850 revenue and 150 police personnel ready for the election process

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.