७३३ उमेदवारी अर्ज मागे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:40 IST2021-01-08T05:40:13+5:302021-01-08T05:40:13+5:30
तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीला दिवसेंदिवस रंग वाढत चालला आहे. गावागावात केवळ निवडणुकीचीच चर्चा पाहावयास मिळत आहे. सोमवारी उमेदवारी अर्ज मागे ...

७३३ उमेदवारी अर्ज मागे
तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीला दिवसेंदिवस रंग वाढत चालला आहे. गावागावात केवळ निवडणुकीचीच चर्चा पाहावयास मिळत आहे. सोमवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिवस व उमेदवार चिन्ह वाटप असल्याने नगरपालिकेच्या मंगल कार्यालयात मोठी गर्दी झाली होती. या निवडणुकीसाठी २ हजार ५०४ अर्ज दाखल झाले होते. त्यापैकी ४३ अर्ज छाननीत बाद झाले. तर २ हजार ४६१ अर्ज पात्र ठरले होते. सोमवारी ७३३ जणांनी माघार घेतल्याने आता चित्र स्पष्ट झाले असून, काही ठिकाणी दुरंगी तर काही ठिकाणी तिरंगी लढती पाहावयास मिळणार आहे.
तालुक्यातील पाच ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या असून, केवळ औपचारिक घोषणा होणे बाकी आहे. यात चांदई एक्को, निमगाव, टाकळी-भोकरदन, कोठा जहांगीर व उमरखेडा या पाच ग्रामपंचायतींचा समावेश आहे.