घनसावंगीत ७३२ सक्रिय रुग्ण : ६१ जणांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:28 IST2021-05-17T04:28:37+5:302021-05-17T04:28:37+5:30
घनसावंगी / तीर्थपुरी : घनसावंगी तालुक्यात मागील काही दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. तालुक्यात आजवर ५,४६७ ...

घनसावंगीत ७३२ सक्रिय रुग्ण : ६१ जणांचा मृत्यू
घनसावंगी / तीर्थपुरी : घनसावंगी तालुक्यात मागील काही दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. तालुक्यात आजवर ५,४६७ जणांना कोरोनाची लागण झाली आहे तर ४,६७४ जणांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या ८६ गावांमधील ७३२ जणांवर विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. आतापर्यंत ६१ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून घनसावंगी तालुक्यात १४० गावांमध्ये ५,४६७ जणांना कोरोनाची लागण झाली होती. त्यापैकी ४,६७४ जणांनी कोरोना मात केली आहे, तर सध्या ७३२ रुग्ण उपचार घेत आहेत.
यात घनसावंगी तालुक्यातील ढाकेफळ २५, कंडारी (परतूर) १९, देवडी हदगाव ८, जिरडगाव १२, मासेगाव ११, माहेर जवळा ६, भादली ६, गुंज २९, राजा टाकळी ७, धामणगाव ७, नाथनगर ४६, नागोबाचीवाडी १०, पिंपळगाव ६, विठ्ठलनगर ४, भोगगाव १५, तीर्थपुरी २६, कंडारी (अंबड) ९, दैठणा खुर्द ६, बोडखा, खालापुरी, दहिगव्हाण, शेवगळ येथे प्रत्येकी ८, राणी उंचेगाव २५, शिंदे वडगाव ६, तळेगाव ७, मंगू जळगाव ११, आंतरवाली दाही ५, देवी दहेगाव ६, मच्छींद्रनाथ चिंचोली १४, लिम्बी १३, लिंबुणी ११, पिंपरखेड ६, आरगडे गव्हाण १३, जांबसमर्थ १०, कोठाळा १४, एकलहरा १३, साकळगाव १५, घनसावंगी ५०, घाणेगाव ६, मंगरूळ १०, राजेगाव १०, कुंभार पिंपळगाव ३९, सिंदखेड १२, रामगव्हाण १५, रांजणी, येवला, राजंणीवाडी, शिवणगाव, ऊकडगाव, मुरमा, घोणसी खुर्द, घोंशी बुद्रुक, मांदळा, दैठणा बुद्रुक, खडका, बाचेगाव, बानेगाव, बोलेगाव, शेवता, गाढे सावरगाव, सरफ गव्हाण, भेंडाळा तांडा, मानेपुरी, मूर्ती, लिंगशेवाडी येथे प्रत्येकी ३, यावल पिंपरी, हातडी, रामसगाव, वडी रामसगाव, नाईक पाडळी येथे प्रत्येकी ४, कोकाटे हादगाव ७, चापडगाव ५, गुरूपिंपरी ५, आंतरवाली राठी, देव हिवरा, तनवाडी, सूतगिरणी, कुंभार पिंपळगाव तांडा, पानेवाडी येथे प्रत्येकी २, पांगरा, देवनगर तांडा, लमानवाडी, बोरगाव, पारडगाव, खापरदेव हिवरा, बोधलापुरी, मोहपुरी, भायगव्हाण, भेंडाळा, जोगलादेवी, मुडेगाव, निपाणी पिंपळगाव येथील प्रत्येकी एका रुग्णावर उपचार सुरू आहेत.
या गावात झाले मृत्यू
n घनसावंगी तालुक्यात आतापर्यंत ६१ जणांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे, अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी नागेश सावरगावकर यांनी दिली.
n यात घनसावंगी ६, साकळगाव ३, तीर्थपुरी ३, गुंज, धामणगाव, नाथनगर, बोरगाव, मुरमा, आंतरवाली टेंभी, पिंपरखेड, गुरु पिंपरी, चापडगाव येथे प्रत्येकी २, कोठीगाव ३, रांजणी पांगरा, कंडारी (परतूर), देवडी हदगाव, जिरडगाव, माहेर जवळा, यावल पिंपरी तांडा येथील प्रत्येकी दोघांचा मृत्यू झाला आहे.
२.५८ टक्के संक्रमण
घनसावंगी तालुक्याची लोकसंख्या २०११च्या जनगणनेनुसार २ लाख ११ हजार १०८ एवढी आहे. तर घनसावंगी शहराची लोकसंख्या ७,५२५ एवढी आहे. लोकसंख्येच्या प्रमाणात विचार केल्यास संक्रमणाचे प्रमाण २.५८ टक्के एवढे आहे.