शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
2
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
3
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
4
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
5
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
6
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
7
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
8
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
9
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
10
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
11
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
12
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
13
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
14
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
15
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
16
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
17
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
18
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
19
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
20
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
Daily Top 2Weekly Top 5

दहा महिन्यांत एकही वीज बिल न भरणारे ६० हजार ग्राहक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:29 IST

जालना : गत दहा महिन्यात एकही वीज बिल न भरणारे जिल्ह्यात तब्बल ६० हजार ग्राहक आहेत. त्यांच्याकडे ७४ कोटींची ...

जालना : गत दहा महिन्यात एकही वीज बिल न भरणारे जिल्ह्यात तब्बल ६० हजार ग्राहक आहेत. त्यांच्याकडे ७४ कोटींची थकबाकी असून, या ग्राहकांनी थकीत वीज बिल भरावे, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

कोरोनामुळे लॉकडाऊन जाहीर करण्यात आले होते. त्यामुळे ग्राहकांचे रीडिंग घेणे बंद करण्यात आले होते. मार्च ते जूनपर्यंत सुरळीत वीज पुरवठा ठेवण्यात आला आहे. विशेष म्हणजे या १० महिन्यांच्या कालावधीत थकबाकीच्या कारणावरून सर्वच वर्गवारीमधील एकाही वीज ग्राहकाचा वीज पुरवठा खंडित केला नाही. वाढत्या थकबाकीच्या पार्श्वभूमीवर विजेचा मागणी व पुरवठा यामध्ये महावितरणला वीजखरेदीचा आर्थिक ताळमेळ बसविण्यासाठी ग्राहकांनी थकीत बिले भरणे गरजेचे आहे. दर महिन्यात होणाऱ्या वीज बिल वसुलीचे प्रमाण अतिशय कमी असल्याने दरमहा वीज खरेदी, कंत्राटदारांची देणी, कर्जांचे हप्ते, आस्थापना खर्च, दैनंदिन देखभाल व दुरुस्ती खर्च भागवणे अशक्य होत आहे. परिणामी, येत्या काही दिवसात या थकबाकीमुळे वीज पुरवठ्यावरदेखील परिणाम होण्याची व अडचणी येण्याची शक्यता आहे. त्यामुळे वीज ग्राहकांनी वेळेत वीज बिले भरावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.