ग्रामपंचायतींंमध्ये ६० टक्के तरुण कारभारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 04:30 IST2021-01-20T04:30:40+5:302021-01-20T04:30:40+5:30

जिल्ह्यातील ४७५ ग्रामपंचायतींची मुदत नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये संपली होती. ४७५ पैकी २६ ग्रामपंचायतींची बिनविरोध निवडणूक झाली, तर ४७८ सदस्य बिनविरोध निवडून ...

60% young stewards in Gram Panchayats | ग्रामपंचायतींंमध्ये ६० टक्के तरुण कारभारी

ग्रामपंचायतींंमध्ये ६० टक्के तरुण कारभारी

जिल्ह्यातील ४७५ ग्रामपंचायतींची मुदत नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये संपली होती. ४७५ पैकी २६ ग्रामपंचायतींची बिनविरोध निवडणूक झाली, तर ४७८ सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत. ४४६ ग्रामपंचायतींच्या ३,६५३ जागांसाठी मतदान झाले. जिल्ह्यात ८२.३२ टक्के मतदान झाले आहे. सोमवारी ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. १२,३३२ पैकी ४,१४६ उमेदवारांनी विजय मिळविला. यात तरुण उमेदवारांचा मोेठ्या प्रमाणात सहभाग पाहायला मिळाला.

भोकरदन तालुक्यात सर्वाधिक तरुण उमेदवार

जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यात सर्वाधिक तरुण उमेदवार निवडून आले आहेत. गावाचा विकास खुटल्याने यंदाच्या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात तरूणांनी सहभाग घेतला असल्याचे चित्र आहे. भोकरदन तालुक्यात जवळपास ६५ टक्के तरुण निवडून आले आहेत.

मागील अनेक वर्षांपासून गावाचा विकास खुटला आहे. ज्येष्ठ मंडळींना डिजिटल युगाचे ज्ञान नाही. त्यामुळे आमच्या गावातील बहुतांश निवडणुकीत उभे राहिले होते. मतदारांनीही त्यांच्या बाजूने कौल दिला आहे.

गौरव निरवळ, नाणशी, मंठा

माझ्या गावाची राज्यात आदर्श गाव म्हणून ओळख व्हावी, यासाठी आपण यंदाची निवडणूक लढविली आहे आणि यात आपण विजयीही झालो आहे. आता फक्त विकास करायच आहे.

पंकज सोळुंके, गोंदी, अंबड

Web Title: 60% young stewards in Gram Panchayats

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.