टेंभुर्णी ग्रामपंचायतीच्या १७ जागांसाठी ५८ जण रिंगणात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:42 IST2021-01-08T05:42:32+5:302021-01-08T05:42:32+5:30
टेंभुर्णी : जाफराबाद तालुक्यातील सर्वात मोठी असलेल्या टेंभुर्णी ग्रामपंचायतीच्या १७ जागांसाठी ५८ जण रिंगणात उतरले आहेत. सोमवारी अर्ज मागे ...

टेंभुर्णी ग्रामपंचायतीच्या १७ जागांसाठी ५८ जण रिंगणात
टेंभुर्णी : जाफराबाद तालुक्यातील सर्वात मोठी असलेल्या टेंभुर्णी ग्रामपंचायतीच्या १७ जागांसाठी ५८ जण रिंगणात उतरले आहेत. सोमवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी ४३ जणांनी माघार घेतली. त्यामुळे आता केवळ ५८ जण रिंगणात राहिले आहेत.
संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागलेल्या या टेंभुर्णी ग्रामपंचायतीमध्ये भाजपा विरुद्ध राष्ट्रवादी अशी सरळ लढत होणार आहे. असे असले तरी अनेक वाॅॅर्डातून तिरंगी लढती होणार आहे. त्यामुळे निवडणुकीतील चुरस आणखी वाढली आहे. प्रभाग चारमध्ये सर्वाधिक १३ तर प्रभाग तीनमध्ये सर्वात कमी ६ जण निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
प्रभागनिहाय निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांमध्ये प्रभाग एक- ११, प्रभाग दोन - १०, प्रभाग तीन- ६, प्रभाग चार- १३, प्रभाग पाच- १०, प्रभाग सहा- ८ याप्रमाणे उमेदवार आहेत.
पूर्वी निघालेल्या आरक्षणाप्रमाणे सरपंचपद मागासवर्गीय महिलेसाठी आरक्षित निघाल्याने तेच आरक्षण कायम राहील, असे गृहीत धरून मागासवर्गीयांसाठी राखीव असलेल्या प्रभाग चार व प्रभाग पाचमधील राखीव जागेवरून प्रत्येकी ४ महिला उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. उमेदवारांना प्रचारासाठी मंगळवारपासून १० दिवस मिळणार असल्याने आता गावचे वातावरण निवडणुकीच्या रंगाने ढवळून निघणार आहे.