३८ ग्रा.पं.च्या निवडणुकीसाठी ५६० अधिकारी, कर्मचारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:19 IST2021-01-13T05:19:52+5:302021-01-13T05:19:52+5:30
परतूर : तालुक्यातील ३८ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी ५६० अधिकारी, कर्मचा-यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शिवाय वाहनांचीही जमवाजमवही सुरू आहे. परतूर ...

३८ ग्रा.पं.च्या निवडणुकीसाठी ५६० अधिकारी, कर्मचारी
परतूर : तालुक्यातील ३८ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी ५६० अधिकारी, कर्मचा-यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शिवाय वाहनांचीही जमवाजमवही सुरू आहे.
परतूर तालुक्यातील ३८ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत. यासाठी निवडणूक विभाग सज्ज झाला असून, ५६० अधिकारी, कर्मचाºयांची नियुक्ती करण्यात आली आहे. तालुक्यात मतदान केंद्राची संख्या १२२ आहे. यासाठी १२२ केंद्राध्यक्षांची नियुक्ती करण्यात आली असून, १८ टीम राखीव ठेवण्यात आल्या आहेत. निवडणुकीसाठी निवडणूक विभागाला एकूण १६ वाहने लागणार आहेत. या वाहनांची जमवाजमव सध्या सुरू असल्याचे सांगण्यात आले. या निवडणुकीसाठी परिवहन मंडळाच्या बस नाकारण्यात आल्या असून, तालुक्यातील इंग्लिश स्कूलच्या बसची मागणी करण्यात आली. हे विशेष होय.
आगार प्रमुखाचे पत्र
सुरूवातीस परतूर तहसील कार्यालय व मंठा तहसील कार्यालयाने आगाराकडे बसची विचारणा करून बसची मागणी केली होती. या नंतर याबाबत निवडूक विभागाने काहीच पाठपुरावा न केल्याने आता आगारप्रमुखांनीच तहसील कार्यालयास पत्र पाठवून आमच्या बसचे काय झाले? अशी विचारणा केली असल्याचे सांगण्यात आले.