९५१ गावांतील घरांना दरडाेई ५५ लिटर पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:56 IST2021-02-06T04:56:18+5:302021-02-06T04:56:18+5:30

रविवारी शिबिर जालना : येत्या रविवारी जालना येथील स्वामी विवेकानंद हॉस्पिटल येथे लायन्स क्लब ऑफ जालना लायन्स ...

55 liters of water per household in 951 villages | ९५१ गावांतील घरांना दरडाेई ५५ लिटर पाणी

९५१ गावांतील घरांना दरडाेई ५५ लिटर पाणी

रविवारी शिबिर

जालना : येत्या रविवारी जालना येथील स्वामी विवेकानंद हॉस्पिटल येथे लायन्स क्लब ऑफ जालना लायन्स आय हॉस्पिटल चिकलठाणा यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्रतपासणी व मोतिबिंदू शस्त्रक्रियाचे आयोजन करण्यात आले आहे.

तीन आरोपींना कारावास; न्यायालयाचा निकाल

जालना : डोक्यात कुऱ्हाडीने वार करून ठार करण्याचा प्रयत्न केल्याने संबंधित तिन्ही आरोपींना ३०७ च्या गुन्ह्यात जालना जिल्हा सत्र न्यायालयाने पाच वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. न्यायाधीश सुनील वेदपाठक यांच्या पीठाने बुधवारी ही शिक्षा सुनावली आहे. आरोपींमध्ये एका महिलेचा समावेश असल्याचे सांगण्यात आले आहे.

हल्ला करून पळवलेली स्कॉर्पिओ आढळली

परतूर : भाड्याने घेतलेल्या स्कोर्पिओच्या ड्रायव्हरवर हल्ला करून पळवून नेलेली स्कॉर्पिओ घनसावंगी शिवारात बेवारस स्थितीत आढळून आली असल्याची माहिती परतूरचे सपोनि. रवींद्र ठाकरे यांनी दिली. परभणी येथून पारडगाव येथे जाण्यासाठी दोन अनोळखी व्यक्तींनी ऋषी अच्युत काळे हे चालक असलेली स्कॉर्पिओ भाड्याने घेतली होती.

सेवानिवृत्तीनिमित्त कुलकर्णी यांचा सत्कार

तीर्थपुरी : ३८ वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जायकवाडी वसाहत, तीर्थपुरी येथे मुख्याध्यापक म्हणून कार्यरत असलेले अशोक कुलकर्णी ३१ जानेवारी रोजी सेवानिवृत्त झाले. त्यानिमित्त त्यांचा शाळेत सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला गटशिक्षणाधिकारी राजेंद्र जोशी, सदस्य रमेश बोबडे, माजी सरपंच शैलेंद्र पवार, अंकुश बोबडे, कैलास जारे आदी उपस्थित होते. अंबड येेथे आज विविध धार्मिक कार्यक्रम

अंबड : श्री बालाजी महोत्सवानिमित्त अंबड येथील बालाजी मंदिर (गोसावी) येथे ६ ते १० फेब्रुवारीपर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यात विष्णूसहस्रनाम, पवमान अभिषेक, महिला मंडळाचे भजन, कीर्तन आदी कार्यक्रमांचा समावेश आहे. शशांक काळबांडे, वसू देशमुख, अंजली देशपांडे, भालचंद्र महाराज सरदेशपांडे यांचे कीर्तन होणार आहे. लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.

छावा संघटना करणार ग्रा.पं. समोर उपोषण

अंबड : तालुक्यातील साष्टपिंपळगाव येथील ठिय्या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी अखिल भारतीय छावा संघटना व सकल मराठा समाजच्या वतीने ६ फेब्रुवारी रोजी प्रत्येक गावातील ग्रामपंचायत कार्यालयासमोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे. यात सहभाग नोंदवावा, असे आवाहन संघटनेचे मराठवाडा कार्याध्यक्ष संतोष जेधे, जिल्हाध्यक्ष देवकर्ण वाघ, तालुकाध्यक्ष राधेश्याम पवळ आदींनी केले आहे. रविदास व्याख्यानमाला अध्यक्षपदी नंदा पवार

जालना : शहरातील गुरू रविदास महाराज व्याख्यानमाला अध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्त्या नंदा पवार यांची तर सचिवपदी परिवर्तनवादी चळवळीतील युवक कार्यकर्ते विशाल साळवे यांची निवड करण्यात आली आहे. मंगळवारी अंबड चौफुलीजवळील शासकीय विश्रामगृहात ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डी. एस. सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ही निवड करण्यात आली. यावेळी जेष्ठ नेते विजयकुमार पंडित आदी उपस्थित होते.

Web Title: 55 liters of water per household in 951 villages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.