जालन्यात कोरोनाचे ५२० नवीन रुग्ण, पाचजणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:28 IST2021-03-21T04:28:29+5:302021-03-21T04:28:29+5:30

४४२ रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातून डिस्चार्ज - -- जिल्हा शल्यचिकित्सकांची माहिती जालना दि. २० (जिमाका) : जिल्ह्यात शनिवारी सायंकाळी ...

520 new corona patients die in Jalna | जालन्यात कोरोनाचे ५२० नवीन रुग्ण, पाचजणांचा मृत्यू

जालन्यात कोरोनाचे ५२० नवीन रुग्ण, पाचजणांचा मृत्यू

४४२ रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातून डिस्चार्ज -

-- जिल्हा शल्यचिकित्सकांची माहिती

जालना दि. २० (जिमाका) : जिल्ह्यात शनिवारी सायंकाळी प्राप्त अहवालानुसार कोरोनाबाधितांचा आकडा हा ५२० वर पोहोचला असून, पाचजणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. गेल्या आठवडाभरापासून रुग्णसंख्या सातत्याने वाढत असल्याने चिंता वाढली आहे. असे असतानाच शनिवारी कोरोनातून बरे होणाऱ्यांची संख्याही वाढत असून, जवळपास ४४२ जणांना रुग्णालय तसेच कोविड केअर सेंटरमधून सुटी देण्यात आली आहे.

जिल्ह्यातील तालुकानिहाय रुग्ण संख्या अशी आहे. त्यात जालना तालुक्यातील जालना शहर - ३४३, जळगाव -१, मोतीगव्हाण -१, बापकल -२, बाजीउम्रद -१, खरपुडी -३, नेर -२, नसदगाव -३, गोलापांगरी -१, बठण -१, वैदुवाडी -१, सोमनाथ जळगाव -१, चितळीपुतळी -१, सरफगव्हाण -१, पुणेगाव -२, साररगाव -१, रेवगाव -१, कारला -२, इंदेवाडी -१, खरपुडी -१, मंठा तालुक्यातील मंठा शहर -२, पांगरी खु. -१, पांगरी बु. -१, पाटोदा -१३, परतूर तालुक्यातील परतूर शहर -३, वाटुर -१, वरफळ -१, वडीवाघाडी -१, घनसावंगी तालुक्यातील घनसावंगी शहर -९, अंतरवाली दाई -१७, राजेगाव -१, राणी उंचेगाव -२, तीर्थपुरी -१५, रांजणी -१, सरफगव्हाण -१, अंबड तालुक्यातील अंबड शहर -४, भालगाव -१, दोदडगाव -३, जामखेड -२, कांचनवाडी -१, मठपिंपळगाव -१, नवीन शिरसगाव -१, पाथरवाला -१, शहापूर -१, चुरमापुरी -३, सोनक पिंपळगाव -१, सुखापुरी -१, वडीगोद्री -१, बदनापूर तालुक्यातील बदनापूर शहर -१, भरडखेडा -२, चणेगाव -१, दावलवाडी -२, देवीगव्हाण -१, मांडवा -१, राजेवाडी -१, जाफ्राबाद तालुक्यातील जाफ्राबाद शहर -३, अंबेगाव -१, टेंभुर्णी -५, निमखेडा -१, कुंभारझरी -१, डावरगाव -१, गोकुळवाडी -१, सोनखेड -४, पिंपळगाव -१, भोकरदन तालुक्यातील शेलूद - २, वालसावंगी - ८, सोयगाव -१, सुरंगली -१, कल्याणी -२, राजूर -१, वाडी -१, हिसोडा -१, इतर जिल्ह्यातील बुलडाणा -६, औरंगाबाद -९, बीड-१, परभणी -१, अशाप्रकारे आरटीपीसीआरद्वारे ३५्०, तर अँटिजेन तपासणीद्वारे १७० असे एकूण ५२० व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सकांनी दिली.

जिल्ह्यात एकूण संशयित रुग्ण- २६६४६ असून, सध्या रुग्णालयात- ७४२ व्यक्ती भरती आहेत, एकूण भरती केलेल्या व्यक्ती- आठ हजार आहेत. दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या- ३४२४ एवढी आहे.

Web Title: 520 new corona patients die in Jalna

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.