पशुधन प्रदर्शनात पाच कोटी रूपयांची उलाढाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2019 00:27 IST2019-02-11T00:26:16+5:302019-02-11T00:27:02+5:30
जालना येथे २ ते ४ फेब्रुवारी दरम्यान राष्ट्रीय पशु-पक्षी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.

पशुधन प्रदर्शनात पाच कोटी रूपयांची उलाढाल
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : जालना येथे २ ते ४ फेब्रुवारी दरम्यान राष्ट्रीय पशु-पक्षी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या तीन दिवसांच्या प्रदर्शनास जवळपास पाच लाख शेतकरी, नागरिकांनी भेट दिल्याची माहिती संयोजकांनी दिली आहे. या प्रदर्शनातील उलाढाल ही पाच कोटी रूपयांच्या घरात गेल्याचे पशुधन प्रदर्शनाचे संपर्क अधिकारी संदीप गिट्टे यांनी दिली.
गेल्या आठवडाभरापासून या प्रदर्शनाची जय्यत तयारी केली जात होती.
या प्रदर्शनात महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यातून बचतगट तसेच शेती संबंधित सािहत्य तसेच पशु-पक्षी सहभागी झाले होते. यावेळी शेळ्या, मेंढ्या तसेच अनेक जातिवंत घोडे, रेडे, गावरान, जर्सी गाय, खिल्लारी बैलजोडी आदींची येथे बुकिंग जवळपास ३० लाख रूपयांची झाली आहे.
एकूणच हे प्रदर्शन म्हणजे पशुपालकांसाठी एक पर्वणी ठरली. यावेळी ज्या पशुपालकांनी प्रदर्शनात आपले पशुधन आणले होते. ते त्यांना किती जिवापाड सांभाळतात, हे दिसून आले. आपण जनावरांना कस्पटासमान वागणूक देतो, मात्र जातिवंत पशु सांभाळताना ते किती परिश्रम घेतात, हे यातून शिकायला मिळाले.