जिल्ह्यात ४७३ जण पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:31 IST2021-04-02T04:31:16+5:302021-04-02T04:31:16+5:30

जालना : कोविड रुग्णालयात उपचार घेणाऱ्या सातजणांचा गुरुवारी मृत्यू झाला, तर गुरुवारीच नवीन ४७३ रुग्णांची भर पडली. रुग्णालयातील उपचारांनंतर ...

473 positive in the district | जिल्ह्यात ४७३ जण पॉझिटिव्ह

जिल्ह्यात ४७३ जण पॉझिटिव्ह

जालना : कोविड रुग्णालयात उपचार घेणाऱ्या सातजणांचा गुरुवारी मृत्यू झाला, तर गुरुवारीच नवीन ४७३ रुग्णांची भर पडली. रुग्णालयातील उपचारांनंतर कोरोनामुक्त झालेल्या १३२ जणांनाही घरी सोडण्यात आले आहे.

बाधितांमध्ये जालना शहरातील २१७, तर तालुक्यातील मालेगाव १, नाव्हा ६, रेवगाव १, रामनगर १, शेलू १, दहिफळ तांडा १, खामवाडी २, डुकरी पिंप्री ७, धनगरपिंप्री १, कुंबेफळ १, पिरपिंपळगाव १, धानोरा १, सावरगाव १, सादगाव येथील एकास कोरोनाची बाधा झाली आहे. मंठा शहरातील ५, तर तालुक्यातील रामतीर्थ २, पांगरी १, पाटोदा २, इरनदेश्वर १, हेलस येथील एकास कोरोनाची लागण झाली. परतूर शहरातील ९, तर तालुक्यातील आनंदवाडी ४, कारवा १, खांडवी ३, गोळेगाव १, वाटूर ६, खंदारी १, आष्टी १, कारला २२, जयपूर येथील दोघांचा अहवाल पॉझिटिव्ह आला.

घनसावंगी शहरातील ५, तर तालुक्यातील कुंभारपिंपळगाव १०, मूर्ती १, चापडगाव ३, येवलपिंप्री १, राहेरा १, बेलगाव २, लिंबी १, राजाटाकळी १, बोडखा १, रांजणगाव २, खंडका १, खंदारी १, राणी उंचेगाव २, यमचिंचोली १, जांबसमर्थ येथील एकास कोरोनाची बाधा झाली. अंबड शहरातील १७, तर तालुक्यातील गोलापांगरी १, रोहिलागड १, शहापूर १, वडीगोद्री १, लासूर १, बेलगाव १, साष्टपिंपळगाव १, हस्तपोखरी १, सावरगाव २, दरेगाव २, धनगरपिंप्री १, लालवाडी १, गोविंदपूरतांडा १, मठजळगाव १, गोंदी १, बावणेपांगरी येथील एकास कोरोनाची लागण झाली. बदनापूर शहरातील १०, तर तालुक्यातील खंदारी १, देवपिंपळगाव १, केळीगव्हाण ३, नजिकपांगरी ३, अवनी १, शेलगाव ८, धवलवाडी ८, अकोला १, गोकुळवाडी १, गेवराईबाजार येथील दोघांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. जाफराबाद तालुक्यातील खासगाव १, बऱ्हाणपुरी १, टेंभुर्णी २, निवडुंगा १, वरुड खू १, खानपूर १, निमखेड १, डोलखेड १, गोकुळवाडी १, तर भोकरदन तालुक्यातील भोकरदन शहर १३, राजूर ३, दानापुरी १, सुरंगळी १, निमगाव १, वैजापूर १, नळणी १, सिरसगाव १, अन्वा १, अडगाव १, वाढोना १, धावडा १, तडेगाववाडी १, लेहा २, बाभूळगाव ३, केदारखेडा येथील दोघांना कोरोनाची लागण झाली. औरंगाबाद जिल्ह्यातील दोन, बुलडाणा ११, परभणी येथील एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला.

अलगीकरण केंद्रात १९७ जण

जिल्ह्यात आजवर २६ हजार ८७४ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले असून, त्यातील ५०३ जणांचा मृत्यू झाला आहे, तर रुग्णालयातील उपचारांनंतर २२ हजार ३०५ जण कोरोनामुक्त झाले. संस्थात्मक अलगीकरण केंद्रात १९७ जणांना ठेवण्यात आले असून, त्यांच्यावर नियमित उपचार सुरू असल्याचे सांगण्यात आले. यात राज्य राखीव पोलीस बल क्वार्टर बी ब्लॉक ५६, राज्य राखीव पोलीस बल क्वार्टर सी ब्लॉक २८, के.जी.बी.व्ही. परतूर १३, शासकीय तंत्रनिकेतन (मुलींचे) वसतिगृह, अंबड ६७, शासकीय मुलांचे वसतिगृह, बदनापूर १६, के.जी.बी.व्ही. घनसावंगी १४ व जाफराबाद येथील आयटीआय कॉलेजमध्ये एकास ठेवण्यात आले आहे.

Web Title: 473 positive in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.