जिल्ह्याात कोरोनाचे ४२९ नवीन रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:28 IST2021-03-19T04:28:45+5:302021-03-19T04:28:45+5:30
जालना शहर ३०५, चंदनझिरा ३, पळसखेडा १, इंदेवाडी ३, नसडगाव १, अंतरवाला १, धावेडी १, सेवली १, वाघ्रुळ ...

जिल्ह्याात कोरोनाचे ४२९ नवीन रुग्ण
जालना शहर ३०५, चंदनझिरा ३, पळसखेडा १, इंदेवाडी ३, नसडगाव १, अंतरवाला १, धावेडी १, सेवली १, वाघ्रुळ ४, दरेगाव १, पोखरी १, कुंभेफळ १, सोमनाथ जळगाव १, रेवगाव २, दुधना काळेगाव १, भाटेपुरी २, वझर १, सिंधी काळेगाव १ असे एकूण जालना शहर आणि तालुक्यात ३३१ रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. मंठा शहर १, पाटोदा १७, ढोकसाळ १, केदारवाडी १, असे एकूण २१, परतूर शहर १९, दैठणा १ श्रीष्टी १, कोकाटे हादगाव ४, आंबा ५, रोहिणा ३, वैजोडा १, असे एकूण ३४ रुग्ण परतूर तालुक्यात आहेत.
घनावांगी तालुक्यात सिध्देश्वर पिंपळगाव १, अंबड शहर २, जामखेड २, मालेवाडी १, शहागड २, बनटाकळी २, गाेंदी एक, हास्तपोखरी १, असे एकूण ११ रुग्ण आढळले आहेत. बदनापूर तालुक्यात शेलगाव १, काजळा २, पाडळी १, मेव्हणा १, आसरखेडा १, मानदेऊळगाव १, बावने पांगरी १, असे एकूण ८ रुग्ण आहेत. जाफराबाद शहर १, अकोला १, एकूण २, भोकरदन तालुक्यात मंगलवाडी १, गोकूळ १, चिंचोली १, कल्याणी १, हिसोडा १, अडगाव १, असे एकूण ६ रुग्ण आहेत. अन्य जिल्ह्यातील बुलडाणा ४, परभणी १ असे ४१९ रुग्ण आहेत. गुरुवारी कोरोनामुळे चार जणांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे.
चौकट
जालना तहसीलमध्ये कही खुशी कही गम
जालना येथील तहसील कार्यालयात अँटिजन चाचणी करण्यात आली. त्या चाचणीत तहसीलदारांसह अन्य काही कर्मचारी पॉझिटिव्ह आले होते. त्यामुळे मोठी खळबळ उडाली होती; परंतु नंतर या सर्व कर्मचाऱ्यांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली. त्यात तहसीलदार आणि अन्य कर्मचारी निगेटिव्ह आले आहेत. एकूणच या चाचण्यांमधील बदलामुळे काहींना दिलासा मिळाला आहे, तर काहीजण आरटीपीसीआरमध्ये पॉझिटिव्ह निघाले आहेत. त्यामुळे तहसील कार्यालयात कही खुशी कही गमचे वातावरण होते.