शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

१३६५ शेतकऱ्यांचे सावकारी कर्ज होणार माफ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2019 01:01 IST

जिल्ह्यातील ८५ सावकारांनी कार्यक्षेत्राबाहेरील १३६५ शेतक-यांना दिलेले १ कोटी ५० लाख ८२ हजार रूपयांचे कर्ज माफ होणार आहे.

विजय मुंडे ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : शासनाच्या सावकारकी कर्जमाफी योजनेतून सावकाराच्या परवाना कार्यक्षेत्राच्या बाहेरील शेतकरी वंचित राहिले होते. मात्र, नुकताच शासनाने कार्यक्षेत्राबाहेरील शेतकऱ्यांना कर्ज देणा-या सावकारांकडील कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार जिल्ह्यातील ८५ सावकारांनी कार्यक्षेत्राबाहेरील १३६५ शेतक-यांना दिलेले १ कोटी ५० लाख ८२ हजार रूपयांचे कर्ज माफ होणार आहे.सततच्या दुष्काळामुळे शेतक-यांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे. निसर्गाच्या अवकृपेमुळे खरीप, रबी हंगाम शेतक-यांच्या हातून जात असून, केलेला खर्चही निघत नाही. त्यामुळे शिक्षण, आरोग्य, शेती मशागत यासह इतर कामांसाठी शेतकरी कर्ज मिळावे म्हणून बँकेच्या पाय-या झिजवितात. बँका कर्ज देत नसल्याने अनेकांना सावकारांकडून कर्ज घेतल्याशिवाय गत्यंतर राहत नाही. सावकार कर्ज देत असले तरी भरमसाठ व्याज लावून शेतक-यांची आर्थिक पिळवणूक करतात. शेतक-यांना कमी व्याजदराने कर्ज उपलब्ध व्हावे, यासाठी शासनाने नियम-अटी घालून अनेकांना सावकारकी करण्याची परवानगी दिली. सततच्या दुष्काळामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आल्याने शासनाने २०१५ मध्ये सावकारांकडील कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार जालना जिल्ह्यातील ४० सावकारांनी १२४३ शेतक-यांना दिलेले १ कोटी ३७ लाख रूपयांचे कर्ज माफ झाले होते.मात्र, शासनाच्या या कर्जमाफी योजनेत परवाना कार्यक्षेत्राच्या बाहेरील ज्या शेतकºयांना कर्जाचे वाटप झाले ते कर्ज माफ करण्यात आले नव्हते. हे कर्जही माफ व्हावे, यासाठी शासनस्तरावर मागणी करण्यात आली. न्यायालयातही याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. यंदाही पावसाने पाठ फिरविल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत आला आहे.या पार्श्वभूमीवर शासनाने सावकारांनी कार्यक्षेत्राबाहेरील शेतक-यांना वाटप केलेले कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. यात जालना जिल्ह्यातील ७६ सावकारांनी तालुका कार्यक्षेत्राबाहेरील १३२३ शेतक-यांना १ कोटी ४६ लाख रूपयांचे कर्ज वाटप केले आहे. तर ९ सावकारांनी जिल्ह्याच्या बाहेरील ४२ शेतक-यांना ४ लाख ३७ हजार रूपयांचे कर्ज वाटप केले आहे. असे एकूण १३६५ शेतक-यांचे ८५ सावकारांकडील १ कोटी ५० लाख ८२ हजार रूपयांचे कर्ज माफ होणार आहे. शासन निर्देशानुसार जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने प्रशासकीय प्रक्रिया सुरू केली आहे.जालना जिल्ह्यात सद्यस्थितीत ११० परवानाधारक सावकार आहेत. यात जालना तालुक्यात ७०, बदनापूर ८, अंबड ३, घनसावंगी ९, परतूर ८, मंठा ४, जाफराबाद ६ तर भोकरदन तालुक्यात २ परवानाधारक सावकार असल्याची नोंद जिल्हा उपनिबंधक कार्यालयात आहे.परवाना नूतनीकरण करण्यासाठीही सावकारांची उपनिबंधक कार्यालयात सतत वर्दळ असते. तर काही जण नवीन प्रस्तावही दाखल करीत आहेत.

टॅग्स :FarmerशेतकरीMONEYपैसाRegistrarकुलसचिवgovernment schemeसरकारी योजना