शहरं
Join us  
Trending Stories
1
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
4
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
5
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
6
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
7
६ धावांत ४ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
8
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
9
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
10
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
11
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
12
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
13
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
14
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
15
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
16
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
17
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
18
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
19
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
20
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका

सिझेरियनला फाटा देत ३५०० नैसर्गिक प्रसुती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2019 12:59 AM

शासकीय महिला रुग्णालयात वर्षभरात ४ हजार ३६५ प्रसुतींपैकी केवळ ४२३ सिझेरियन प्रसुती करण्यात आल्या

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : आजकाल प्रसुती म्हटलं की, सिझेरियन असेच गणित झाले आहे. मात्र, शासकीय महिला रुग्णालयात वर्षभरात ४ हजार ३६५ प्रसुतींपैकी केवळ ४२३ सिझेरियन प्रसुती करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालयांसह अनेक खासगी दवाखाने आव्हानात्मक प्रसूती म्हणत महिलांना घाटीत रेफर करतात. त्यातूनही घाटीने सिझेरियनचे प्रमाण कमी करण्यात यश मिळविले आहे. शासकीय महिला रूग्णालयात वर्षभरात ३ हजार ९४२ महिलांची नैसर्गिक प्रसुती झाली आहे.शहरातील शासकीय वैद्यकीय रुग्णालयातील सर्वात महत्वाचा समजला जाणारा विभाग म्हणजे प्रसूती विभाग. रुग्णालयात वर्षभरात ४ हजार ३६५ प्रसुती करण्यात आलेल्या आहेत. त्यापैकी ३ हजार ९४२ महिलांची नैसर्गिकरीत्या प्रसुती करण्यात आली, तर ४२३ महिलांची सिझेरियन प्रसुती करण्यात आली आहे.प्रसुतीबाबत महिलेची केस गुंतागुंतीची असेल तरच प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालये किंवा उपजिल्हा रुग्णालयातून त्यांना घाटीत पाठविले जाते. सर्वाधिक गुंतागुंतीच्या प्रसुतीच्या केसेस येत असूनही या वर्षात घाटीत सिझेरियन प्रसुतीचे प्रमाण कमीच आहे. याउलट चित्र खाजगी रुग्णालयांतील आहे. खासगी रुग्णालयांत मोठ्या प्रमाणावर सिझेरियन करून प्रसूती केली जाते. त्यात अनेकदा सिझेरियनची गरज होती का हे तपासणेही गरजेचे आहे, असे तज्ज्ञाचे म्हणणे आहे.मॉनिटिरिंग सिस्टीममुळे पोटात असलेल्या बाळाविषयी सगळ्या गोष्टी समजतात. त्यामुळे नॉर्मल प्रसुती सहज शक्य आहे. मात्र, अनेकदा नातेवाईकही बाळ व आई सुखरूप राहावे, म्हणून सिझेरियनची मागणी करतात.त्यामुळे हे प्रमाण वाढत आहे. मुख्यत्वेकरून गुंतागुंतीची केस असेल तरच सिझेरियन व्हावे. वर्षभरात झालेल्या सिझेरियनचे आॅडिट घाटीत केले जाते. त्यामुळे सिझेरियन झालेली प्रसुती खरेच करणे गरजेचे होते का? तसेच पुन्हा तशीच परिस्थिती आल्यास सिझेरियन कसे टाळता येईल यावर उपाय शोधले जातात, अशी माहिती शासकीय महिला रुग्णालयाचे शल्यचिकित्सक राजेंद्र पाटील यांनी दिली.दरम्यान, मराठवाड्यात जालना जिल्हा नैसर्गिक प्रसुतीमध्ये प्रथम आहे.सिझेरियनची कारणेबाळाचे डोके मोठे आहे. मूल आडवे किंवा पायाळू असल्यास, आईचा रक्तदाब वाढला, मधुमेह असेल, गर्भाशयाच्या तोंडावर गाठ आहे. किंवा नाळ बाळाच्या मानेभोवती किंवा खाली सरकलेली असल्यास प्रसूतीत अडचण येते. त्यासाठी सिझेरियन करावे लागते. पोट व गर्भाशयास छेद घेऊन सिझेरियन प्रसुती केली जाते.कीचकट शस्त्रक्रियांत यशस्त्रीरोग विभागात विविध प्रकारच्या अवघड व कीचकट शस्त्रक्रिया करण्यातही डॉक्टरांना यश आले. महिलांच्या पोटातील विविध आकारांच्या व वजनाच्या गोळ्यांच्या शस्त्रक्रियांचा त्यात समावेश आहे.

टॅग्स :Womenमहिलाhospitalहॉस्पिटलHealthआरोग्य