जालना जिल्ह्यात दोन वर्षात विविध कारणांमुळे ३१ विद्यार्थ्यांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 04:29 IST2020-12-22T04:29:02+5:302020-12-22T04:29:02+5:30
शालेय विद्यार्थ्याचा पाण्यात बडून, चक्कर येऊन, सर्प दंश, विजेचा शॉक लागून मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबास राजीव गांधी विद्यार्थी अपघात ...

जालना जिल्ह्यात दोन वर्षात विविध कारणांमुळे ३१ विद्यार्थ्यांचा मृत्यू
शालेय विद्यार्थ्याचा पाण्यात बडून, चक्कर येऊन, सर्प दंश, विजेचा शॉक लागून मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबास राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजनेअंतर्गत ७५ हजार रूपये दिले जातात. ही योजना शिक्षण विभागामार्फत राबविली जाते. त्यानुसार जालना जिल्ह्यात मागील दोन वर्षात ३१ विद्यार्थ्यांचा विविध कारणांमुळे मृत्यू झाला. यात पाण्यात बुडून सर्वाधिक २१ विद्यार्थ्यांना आपले प्राण गमवावे लागले. विजेचा शॉक लागून २, अपघातात ६ तर चक्कर येणे एकाच मृत्यू झाला आहे. शिक्षण विभागाने सर्व मयत विद्यार्थ्यांचे प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविले होते. जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना मंजुरीदेखील दिली आहेत. परंतु, शासनाने निधी मंजूर न केल्याने अद्याप लाभार्थ्यांना अनुदान मिळाले नाही. याकडे लक्ष देऊन तातडीने अनुदान देण्याची मागणी होत आहे.
शालेय विद्यार्थाचा अपघाती, पाण्यात बडून, विजेचा शॉक लागून आदी कारणांमुळे मृत्यू झाल्यास राजीव गांधी अपघात योजनेअंतर्गत ७५ हजार रूपयांचे अनुदान दिले जाते. परंतु, शासनाने निधी न दिल्यामुळे संबंधितांना अनुदान देण्यात आले नाही. निधी प्राप्त होताच अनुदान दिले जाईल.
- बाळासाहेब खरात, उपशिक्षणाधिकारी
निधी नसल्याने लाभार्थ्यांना अनुदान मिळेना
जालना जिल्ह्यात मागील दोन वर्षात ३१ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. या विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ७५ हजार रूपयांचे अनुदान दिले जाते. त्यानुसार शिक्षण विभागाने सर्व प्रस्तावांना मंजुरी दिली आहेत. परंतु, राज्य शासनाने निधी न दिल्याने लाभार्थ्यांना अनुदानाची प्रतीक्षा आहे. हे अनुदान तातडीने देण्यात यावे, अशी मागणी होत आहे.