ट्रकखाली चिरडल्याने ३० वर्षीय तरुणाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 04:35 IST2021-01-16T04:35:15+5:302021-01-16T04:35:15+5:30

पत्रे वाकवून सव्वालाखांचा मुद्देमाल लंपास जाफराबाद : गेल्या काही दिवसांपासून जाफराबाद तालुक्यात चोऱ्यांच्या घटना वाढल्या आहेत. दरम्यान, ...

30-year-old dies after being crushed under truck | ट्रकखाली चिरडल्याने ३० वर्षीय तरुणाचा मृत्यू

ट्रकखाली चिरडल्याने ३० वर्षीय तरुणाचा मृत्यू

पत्रे वाकवून सव्वालाखांचा मुद्देमाल लंपास

जाफराबाद : गेल्या काही दिवसांपासून जाफराबाद तालुक्यात चोऱ्यांच्या घटना वाढल्या आहेत. दरम्यान, सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास वरुड बु येथील समाधान शिंदे यांच्या घरावरील टिनपत्रे वाकवून घरात शिरलेल्या चोरट्यांनी १ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे. चोरीच्या वेळी त्यांनी काहीतरी औषध फवारून झोपलेल्यांना बेशुद्ध केले होते, असे त्यांनी सांगितले.

गळफास घेऊन तरुणाची आत्महत्या

जाफराबाद : तरुणाने टॉवरला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना जाफराबाद तालुक्यातील वरुड बुद्रुक येथे १३ जानेवारी रोजी घडली. शिवाजी सुदाम काळे (३५) असे मयताचे नाव आहे. शिवाजी काळे हा एक दिवसापासून घरी आलाच नाही. दरम्यान, त्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे आढळून आले. पोलिसांनी पंचनामा केला. मात्र, मृत्यूचे कारण अजून समजले नाही.

Web Title: 30-year-old dies after being crushed under truck