आरटीई प्रवेशासाठी ३ हजार ६०५ अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:30 IST2021-04-07T04:30:48+5:302021-04-07T04:30:48+5:30

आरटीई प्रवेश प्रक्रियेसाठी ३० मार्चपर्यंत ऑनलाईन अर्ज दाखल करण्यास मुदत देण्यात आली होती. जालना जिल्ह्यात २९९ पात्र शाळांमधील २ ...

3 thousand 605 applications for RTE admission | आरटीई प्रवेशासाठी ३ हजार ६०५ अर्ज

आरटीई प्रवेशासाठी ३ हजार ६०५ अर्ज

आरटीई प्रवेश प्रक्रियेसाठी ३० मार्चपर्यंत ऑनलाईन अर्ज दाखल करण्यास मुदत देण्यात आली होती. जालना जिल्ह्यात २९९ पात्र शाळांमधील २ हजार २६२ जागांसाठी ३ हजार ६०५ अर्ज दाखल झाले आहेत. यासाठी नोंदणीची मुदत संपल्यावर आता ६ एप्रिलला प्रवेशाची लॉटरी काढण्याचे निश्चित होत आहे. त्यासाठी सर्व जिल्ह्यांनी ३ एप्रिलपर्यंत डुप्लिकेट फॉर्म रिमूव्ह करण्याचे काम पूर्ण करावे, अशा सूचना शालेय शिक्षण विभागाने दिल्या आहेत. प्रवेश प्रक्रियेसाठी लॉटरी एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात होणार आहे.

आरटीईअंतर्गत सोडतीनंतर एसएमएस मिळाल्यानंतर संबंधित पालकांनी त्यांच्या पाल्याचे ऑनलाईन भरलेल्या सर्व कागदपत्रांची मूळ प्रत नेऊन संबंधित शाळेत प्रवेश प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी. एसएमएस मिळाले नसल्याचे ऑनलाईन खात्री करून घ्यावी.

जिल्ह्यातील २९९ शाळांनी आरटीई अंतर्गत प्रवेशासाठी नोंदणी केली. २,२६२ जागांसाठी पालकांनी ३,६०५ ऑनलाईन अर्ज भरले. राज्यस्तरावर लॉटरीतून दुसऱ्या आठवड्यात होईल. या लॉटरीतून वंचित व दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना मोफत शिक्षणाचा लाभ मिळणार आहे.

तालुका शाळा जागा अर्ज

जालना १८ ४९३ ११५०

अंबड ३७ ३१५ ६४४

परतूर १४ १८ ५७

बदनापूर ८ ११४ १०८

भोकरदन ३६ ३६२ ६१६

जाफराबाद २१ १९८ २९४

मंठा ३३ ३३५ ७३९

घनसावंगी १७ ११७ १७०

Web Title: 3 thousand 605 applications for RTE admission

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.