शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

३११ अंगणवाड्यांना मिळणार नवीन इमारती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2019 00:35 IST

स्वत:ची इमारत नसलेल्या अंगणवाड्यांच्या बांधकामासाठी जिल्हा नियोजन समितीमधून ५ कोटी ५६ लाख व अखर्चिंत निधीतून १८ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : स्वत:ची इमारत नसलेल्या अंगणवाड्यांच्या बांधकामासाठी जिल्हा नियोजन समितीमधून ५ कोटी ५६ लाख व अखर्चिंत निधीतून १८ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. त्यातून ३११ अंगणवाड्यांचे बांधकाम करण्यात येणार असल्याची माहिती महिला व बालकल्याण विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी संगीता लोंढे यांनी दिली.जिल्ह्यात १९४६ अंगणवाड्या आहे. यापैकी ३६८ अंगणवाड्यांना स्वमालकीची इमारत नसल्यामुळे त्या समाजमंदिर, मंदिर, खासगी इमारतीत व जिल्हा परिषदेच्या मालकीच्या इमारतीमध्ये भरत आहेत तर इतर अंगणवाड्यांनाही दुरूस्तीची गरज आहे. त्यामुळे नवीन अंगणवाड्या बांधकामासाठी व अंगणवाड्यांच्या दुरूस्तीसाठी अनेकवेळा निधीची मागणी करण्यात येत होती. परंतु, प्रशासनातर्फे निधी उपलब्ध करून देण्यात आला नाही.अंगणवाड्या बांधकामासाठी जिल्हा नियोजन समितीतून निधी मिळण्यासाठी महिला व बालकल्याण विभागाकडून पाठपुरावा सुरू होता. प्रस्ताव जिल्हा नियोजन समितीकडे सादर केला होता. जिल्हा नियोजन समितीने या प्रस्तावाला मंजूरी दिली असून, ४४ अंगणवाड्या बांधण्यासाठी ५ कोटी ५६ लाख रुपयांचा निधी देण्यात आला आहे. यातील ५० टक्के निधी हा अंगणवाड्यांच्या दुरूस्तीसाठी खर्च करण्यात येईल. तर जिल्हा परिषदेच्या अखर्चींत निधीमधून २६७ अंगणवाड्यांसाठी १८ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.या अंगणवाड्यांच्या बांधकामास लवकरच सुरूवात करण्यात येणार असल्याची माहिती महिला व बालकल्याण विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी संगीता लोंढे यांनी दिली. दरम्यान, अंगणवाड्यांना स्वत:च्या मालकीच्या इमारती नव्हत्या. त्यामुळे त्यांना भेडसावणारी ही समस्या विचारात घेऊन हा निधी उपलब्ध करून देण्यात आला. त्यामुळे ३११ अंगणवाड्या स्वमालकीच्या इमारतीत भरू शकतील.८८ अंगणवाड्यांसाठी ९ कोटींचा प्रस्तावमानव विकास मिशनमधून विविध घटकांसाठी निधी दिला जातो. २०१९-२० या आर्थिक वर्षांसाठी जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाच्यातून ८८ अंगणवाड्यांच्या बांधकामासाठी ९ कोटी रुपयांचा निधीचा प्रस्ताव सादर करण्यात आला. हा प्रस्ताव मंजूर झाल्यावर ८८ अंगणवाड्यांचे काम पूर्ण करण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

टॅग्स :SchoolशाळाEducationशिक्षणJalna z pजालना जिल्हा परिषदfundsनिधी