शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

मांदळा तलावावर सापडल्या २५ मोटारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 29, 2020 23:51 IST

मांदळा तलावातून अवैधरीत्या पाणीउपसा करणाऱ्यांविरुद्ध महसूल पथकाने कारवाई सुरू केली आहे

लोकमत न्यूज नेटवर्कघनसावंगी : तालुक्यातील मांदळा तलावातून अवैधरीत्या पाणीउपसा करणाऱ्यांविरुद्ध महसूल पथकाने कारवाई सुरू केली आहे. पहिल्या टप्प्यात शनिवारी केलेल्या पाहणीत जवळपास २५ शेतकऱ्यांच्या मोटारी तलावावर दिसून आल्या. संबंधित शेतक-यांना समज देऊन पाणीउपसा बंद करण्यात आला. यापुढील काळात अवैध पाणीउपसा केला तर नियमानुसार कारवाई करण्याचा इशारा पथकातील अधिका-यांनी दिला.घनसावंगी तालुक्यातील मांदळा तलावातून पाण्याचा अवैध उपसा सुरू होता. याबाबत जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी पाहणीबाबत सूचना दिल्या होत्या. त्यानुसार नगर पालिका, महसूल व महावितरणच्या अधिकारी, कर्मचा-यांच्या पथकाने पाहणी केली. पाहणीवेळी या तलावावर अवैध पाणी उपसा करणाºया २५ मोटारी दिसून आल्या. याचा पंचनामा करून संबंधितांनी मोटारी, पंप काढून घेण्याच्या सूचना देण्यात आल्या. यापुढील काळात अवैध पाणीउपसा केला तर नियमानुसार कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.यावेळी घनसावंगी तहसीलचे अक्षय देशमुख, नगर पंचायतीचे कर्मचारी ज्ञानेश्वर सोमवारे, राजू भारस्कर, सखाराम नाईक, शेख महेबूब, राजेभाऊ वजीर, दादू हिवाळे, विष्णू कदम, भागवत धाईत, सय्यद अन्वर, कांता सोमवारे, पटेकर, सय्यद हमजा, महावितरणचे उपअभियंता नागरे यांच्यासह पोलीस कर्मचारी उपस्थित होते. दरम्यान, या पाहणीनंतर हे पथक अवैध पाणी उपशाविरुद्ध कारवाई करेल का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

टॅग्स :WaterपाणीtheftचोरीIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्पRevenue Departmentमहसूल विभागmahavitaranमहावितरण