जिल्ह्यात २०.७० मि.मी. पावसाची नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:35 IST2021-07-14T04:35:24+5:302021-07-14T04:35:24+5:30

जालना : जिल्ह्यात दि. १२ जुलै रोजीच्या सकाळपर्यंतच्या मागील २४ तासांत सरासरी २०.७० मि.मी एकूण पावसाची नोंद ...

20.70 mm in the district. Rainfall record | जिल्ह्यात २०.७० मि.मी. पावसाची नोंद

जिल्ह्यात २०.७० मि.मी. पावसाची नोंद

जालना : जिल्ह्यात दि. १२ जुलै रोजीच्या सकाळपर्यंतच्या मागील २४ तासांत सरासरी २०.७० मि.मी एकूण पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात झालेल्या पावसाची तालुकानिहाय आकडेवारी मि.मी.मध्ये पुढीलप्रमाणे असून कंसातील आकडेवारी यंदाच्या एकूण पावसाची आहे. जालना १९.५० (२५०.९०), बदनापूर १३.०० (२९५.९५), भोकरदन १४.६० (२०८.९०), जाफ्राबाद ९.६० (२२७.९० ), परतूर ३२.२० (३५५.००), मंठा ३०.४० (३२२.९० ), अंबड १६.३० (३४५.८०) घनसावंगी ३३.४० (२९७.८० ) मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली आहे. जिल्ह्याची वार्षिक सरासरी ६०३.१० मि.मी. एवढी असून १ जूनपासून आजपर्यंत जिल्ह्यात सरासरी २८२.८० मि.मी. एवढा पाऊस झाला असून त्याची वार्षिक सरासरी ४६.८९ टक्के आहे.

Web Title: 20.70 mm in the district. Rainfall record

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.