जालना जिल्ह्यात १९ हजार नवे मतदार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:56 IST2021-02-06T04:56:33+5:302021-02-06T04:56:33+5:30
चाेरट्यांसह हायवा पोलिसांच्या ताब्यात जालना : जाफराबाद येथून चोरीला गेलेला हायवा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शोधून काढला. हायवा पळविणारे ...

जालना जिल्ह्यात १९ हजार नवे मतदार
चाेरट्यांसह हायवा पोलिसांच्या ताब्यात
जालना : जाफराबाद येथून चोरीला गेलेला हायवा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शोधून काढला. हायवा पळविणारे शेख समीर शेख रज्जाक, शेख फारूख, ब्रह्मा किसन गिरी यांना पोलिसांनी अटक केली आहे.
जवखेडा शाळेत जनजागृतीपर कार्यक्रम
केदारखेडा : जागतिक कर्करोग दिनानिमित्त जवखेडा येथील जल्हा परिषद शाळेत ‘तंबाखुमुक्त शाळा अभियान’ राबविण्यात आले. जनजागृतीपर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक विठ्ठलराव घायाळ, तर प्रमुख पाहुणे म्हणून डी.एस. घोरपडे, पी. व्ही. मिसाळ, ए. बी. काशीद उपस्थित होते. यावेळी विद्यार्थी सुमेध शिंगणे यांने तंबाखू सेवनाचे दुष्परिणाम याबाबत भाषण केले. सूत्रसंचालन एम. एस. शिंगणे यांनी केले. पी. आर. ठोंबरे यांनी आभार मानले.
पालिकेने राबविली स्वच्छता मोहीम
परतूर : परतूर नगर परिषदेच्यावतीने शहरातील आदर्श कॉलनी भागात स्वच्छता मोहीम राबविली. यावेळी रस्ते, नाल्यांची साफसफाई करण्यात आली. गेल्या अनेक दिवसांपासून या भागात कचऱ्याचे ढीग जमा झाले होते. मोहिमेनंतर नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
टायर फुटल्याने
कारचा अपघात
वालसावंगी : टायर फुटल्याने कारचा अपघात झाल्याची घटना सुंदरवाडी ते वाडोना रस्त्यावर घडली. रवींद. जैस्वाल हे आपल्या कुटुंबासह गावी जात होते. तेव्हा टायर फुटल्याने कार झाडावर आदळली. या अपघातात कुणालाही इजा पोहोचली नाही.
आश्वासनानंतर आंदोलन स्थगित
बदनापूर : जालना-औरंगाबाद रस्त्यावरील अतिक्रमणे हटविण्याच्या मागणीसाठी किसान करणी सेना युवा युवामोर्चाच्यावतीने आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता. परंतु बदनापूर नगरपंचायतीने अतिक्रमण हटविण्याचे लेखी दिल्याने हे आंदोलन स्थगित करण्यात आल्याचे प्रदेशाध्यक्ष जयसिंग राजपूत व तालुकाध्यक्ष अरुण खोकड यांनी सांगितले.
वाहन चालविताना खबरदारी घ्यावी
जालना : राज्य रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत उपप्रादेशिक कार्यालयाच्यावतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय काळे यांनी वाहन चालविताना खबरदारी घेणे आवश्यक असल्याचे सांगितले. यावेळी मोटार ड्रायव्हिंग स्कूलचे अध्यक्ष दिलीप शिंदे, वाहन निरीक्षक सचिन झाडबुके, हनुमंत सुळे, उदय साळुंखे, सुभाष डिघे उपस्थित हेाते.
अवैध दारू विक्रेत्यांवर कारवाईची मागणी
बदनापूर : शहरासह ग्रामीण भागात अवैध दारूविक्री मोठ्या प्रमाणात होत आहे. तळीरामांमुळे कायदा- सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असून, भांडण तंट्यातही वाढ होत आहे. शिवाय युवा पिढीही व्यसनाधीन होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे प्रशासनाने दारूविक्रेत्यांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
बदलत्या वातावरणामुळे रब्बीतील पिके धोक्यात
जालना : वातावरणातील सततच्या बदलामुळे रब्बीतील पिकांवर रोगराईचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. फळपिकांनाही या वातावरणाचा फटका बसत आहे. रोगराई दूर व्हावी, यासाठी शेतकरी महागडी औषधे फवारणी करीत आहेत.