उपचारानंतर १७७ जणांना डिस्चार्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:28 IST2021-05-17T04:28:42+5:302021-05-17T04:28:42+5:30
आंबा : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत आंबा येथील कोविड सेंटरमध्ये २८२ जणांना उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यापैकी आतापर्यंत १७७ ...

उपचारानंतर १७७ जणांना डिस्चार्ज
आंबा : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत आंबा येथील कोविड सेंटरमध्ये २८२ जणांना उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यापैकी आतापर्यंत १७७ जणांनी कोरोनावर मात केली आहे, तर ८८ जणांना इतरत्र रेफर करण्यात आले आहे. सध्या १७ जणांवर उपचार सुरू आहेत.
मागील काही दिवसांपासून परतूर शहरासह ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने धुमाकूळ घातला आहे. कोरोनाला रोखण्यासाठी शासनाने कडक निर्बंध लागू केले असले, तरी दिवसागणिक रुग्णसंख्या वाढत आहेत. कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी आंबा येथे कोविड सेंटर सुरू करण्यात आले आहे. दुसऱ्या लाटेत या कोविड सेंटरमध्ये २८२ रुग्ण उपचारासाठी दाखल झाले होते. यातील ८८ जणांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना इतरत्र रेफर करण्यात आले आहे, तर १७७ जणांनी कोरोनावर यशस्वीरीत्या मात केल्याने, त्यांना घरी सोडण्यात आले आहे. सध्या कोविड सेंटरमध्ये केवळ १७ जणांवर उपचार सुरू असल्याची माहिती कोविड सेंटर प्रमुख डॉ.महादेव उनवणे यांनी दिली. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहून नागरिकांनी नियमांचे पालन करावे, असे आवाहन वैद्यकीय अधीक्षक डॉ.डी.आर. नवल यांनी केले आहे.
ग्रामीण भागात वाढतेय रुग्णसंख्या
n तालुक्यातील बाबुलतारा, रोहिणा या गावांमध्ये मागील काही दिवसांपासून रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. रुग्ण दगावण्याचे प्रमाणही वाढले आहेत. बाबुलतारा ९ तर रोहिणा येथे १० जणांचा मृत्यू झाला आहे.