गोरंट्याल यांच्या पुढाकारातून अंत्यसंस्कारासाठी १५ टन सरपण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 04:32 IST2021-04-28T04:32:47+5:302021-04-28T04:32:47+5:30
शहरातील रामतीर्थ स्मशानभूमीच्या सुशोभीकरणासह या स्मशानभूमीचा एकूणच सर्वांगीण विकास करण्यासाठी आ. कैलास गोरंट्याल यांनी पुढाकार घेतला होता. सध्या जालना ...

गोरंट्याल यांच्या पुढाकारातून अंत्यसंस्कारासाठी १५ टन सरपण
शहरातील रामतीर्थ स्मशानभूमीच्या सुशोभीकरणासह या स्मशानभूमीचा एकूणच सर्वांगीण विकास करण्यासाठी आ. कैलास गोरंट्याल यांनी पुढाकार घेतला होता.
सध्या जालना शहर व जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला असून, दररोज कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची संख्यादेखील वाढली आहे. जालना नगर पालिकेच्या वतीने शहरातील मंठा रोडवर उभारण्यात आलेल्या मुक्तिधाम या स्मशानभूमीत कोरोनाबाधित मृतांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी जालना नगर पालिकेच्या वतीने लाकूड, गोवऱ्या व इतर साहित्य उपलब्ध करून दिले जात आहे. यासाठी शहरातील दानशूरांची देखील मदत झाल्याचे आ. गोरंट्याल यांनी नमूद केले.
पर्यावरण लक्षात घेऊन कृत्रिम लाकडांचा पर्याय
ऑक्सिजन देणारी झाडेच नष्ट झाली, तर पर्यावरणाचे खूप नुकसान होईल, असे मत काहींनी व्यक्त केले. ही सूचना लक्षात घेऊन आ. कैलास गोरंट्याल यांनी बायोमास ब्रिकेट (कृत्रिम लाकूड) बद्दल माहिती घेत १५ टन कृत्रिम लाकूड मागवले. शेतातल्या उर्वरित वेस्टगेजपासून बनविलेल्या, कृत्रिम लाकडांचा वापर अंत्यसंस्कारासाठी केल्यास वृक्षतोड नक्कीच थांबेल म्हणूच हा पर्याय निवडण्यात आल्याचे सांगितले. दरम्यान, मंगळवारी मुक्तिधाममध्ये आ. कैलाश गोरंट्याल यांच्यासह स्वच्छता सभापती हरीश देवावाले, नगरसेवक आरेफ खान, शेख शकील, अरुण घडलिंग, गणेश चौधरी, जगदीश गौड व इतरांची उपस्थिती होती.