अनुसूचित जातीसाठी १४ ग्रामपंचायती आरक्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:05 IST2021-02-05T08:05:07+5:302021-02-05T08:05:07+5:30

भोकरदन : तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या सरपंचपद आरक्षणाची गुरुवारी सोडत करण्यात आली. यापूर्वीच्या आरक्षण सोडतीत निंबोळा, दहिगाव, पळसखेडा ठोंबरे-पिंपळगा बारव, पिंपरी, ...

14 Gram Panchayats reserved for Scheduled Castes | अनुसूचित जातीसाठी १४ ग्रामपंचायती आरक्षित

अनुसूचित जातीसाठी १४ ग्रामपंचायती आरक्षित

भोकरदन : तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या सरपंचपद आरक्षणाची गुरुवारी सोडत करण्यात आली. यापूर्वीच्या आरक्षण सोडतीत निंबोळा, दहिगाव, पळसखेडा ठोंबरे-पिंपळगा बारव, पिंपरी, वालसा डावरा, निमगाव, कुंभारी या ग्रामपंचायती सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित झाल्या होत्या. परंतु, या आरक्षण सोडतीत या ग्रामपंचायती ओबीसी प्रवर्गासाठी आरक्षित झाल्या आहेत.

सरपंचपदाच्या निवडीसाठीचा घोडेबाजार थांबविण्यासाठी राज्यसरकारने निवडणुकीपूर्वी काढण्यात आलेले आरक्षण रद्द करून ग्रामपंचायत निवडणूक झाल्यावर सरपंच पदाचे आरक्षण काढण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर गुरुवारी तहसीलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी संतोष गोरड यांच्या अध्यक्षतेखाली तहसील कार्यालयात सरपंच पदासाठीची नव्याने आरक्षण सोडत काढण्यात आली. यात अनुसूचित जातीसाठी लतीफपूर, पिंपळगाव सुतार, गोकुळ, पारध (बु), देहेड, पिंपळगाव शेरमुलकी, सिपोरा बजार, पिंपळगाव रेणुकाई, वजीरखेड- देऊळगाव कमान, दगडवाडी, जळगाव सपकाळ, मानापूर, विझोरा, बरंजळा लोखंडे या ग्रामपंचायती आरक्षित झाल्या आहेत.

अनुसूचित जमातीसाठी वाढोना, पद्मावती, सुरंगळी, धोंडखेडा, कोठा कोळी या ग्रामपंचायती आरक्षित झाल्या आहेत. नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी गोषेगाव, वरुड (बु), माळेगाव, जानेफळ दाभाडी- टाकळी बाजड- टाकळी हिवरडी, कोपरडा, खंडाळा, सावंगी अवघडराव, कोठा जहांगीर, कल्याणी, वाडी (बु)- वाडी (खु), खापरखेडा, पिंपळगाव कोलते, वडोद तांगडा, करजगाव, मालखेडा, कोदोली, तपोवन, बरंजळा साबळे, सिरसगाव वाघृळ- बोरगाव खडक, आव्हाना ठालेवाडी, गव्हाण संगमेश्वर, मोहळाई, सुभानपूर, वाकडी- कुकडी, लेहा, खामखेडा, बेलोरा, निबोळा, दहिगाव, पाळसखेड ठोबरे- पिंपळगाव बारव, पिंपरी, वालसा डावरगाव, निमगाव, कुंभारी या ग्रामपंचायती आरक्षित झाल्या आहेत.

सर्वसाधारणसाठी तांदुळवाडी, मुठाड, जवखेडा (खु), पिंपळगाव थोटे, वालसा वडाळा, वालसा खालसा, राजूर, हसनाबाद, नळणी (बु), तिगलखेड, कठोरा बाजार, जवखेडा ठोबरी, चिंचोली- बोरगाव तारू- देऊळगाव ताड, उमरखेडा, पाळसखेड दाभाडी, लिंगेवाडी, मलकापूर, नांजा- क्षिरसागर, कठोरा जेनपुर, पोखरी- मेहेगाव, टाकळी भोकरदन, लोणगाव, केदारखेडा- मेरखेडा, जानेफळ गायकवाड, शेलुद, शिरसगाव मंडप, बोरगाव जहांगीर, पाळसखेड पिंपळे, आन्वा- करलावाडी, पेरजापूर- प्रल्हादपूर- राजापूर, हिसोडा (खु), आडगाव, जवखेडा (बु), ताडकळस, भिवपूर, सावखेडा- खदगाव, कोदा, आलापूर- रामपूर, धावडा, चांदई ठेपली, तडेगाव- तडेगाव वाडी, भायडी- तळणी, विरेगाव, चांदई एक्को, इब्राईमपूर, गोद्री, रेलगाव, बानेगाव, पारध खुर्द, रजाळा, सोयगाव देवी, ईटा- रामनगर, खडकी, दानापूर, दावतपूर, बाभुळगाव, पाळसखेड मूर्तड, एकेफळ, फत्तेपूर, भोरखेडा, चांदई ठोबरी, कोसगाव, आन्वा पाडा, कोठा दाभाडी, वालसावंगी, गारखेडा- जोमाळा, कोळेगाव, चोरहाळा- मासनपूर, जयदेववाडी या ग्रामपंचायत आरक्षित झाल्या आहेत.

मुलीच्या हस्ते काढल्या चिठ्ठ्या

आरक्षण सोडतीच्या चिठ्ठ्या प्रज्ञा प्रमोद कांबळे या मुलीच्या हस्ते काढण्यात आल्या. यावेळी नायब तहसीलदार बालाजी पापुलवाड, कर्मचारी संजय सपकाळ, राहुल लबडे, विठ्ठल मालोदे, अनिल वानखेडे, स्वप्नील देवकाते यांच्यासह पदाधिकारी, अधिकारी उपस्थित होते.

प्रवर्ग ग्रामपंचायती

सर्वसाधारण ६९

अनुसूचित जाती १६

अनुसूचित जमाती ०५

नागरिकांचा मागास प्रवर्ग ३४

Web Title: 14 Gram Panchayats reserved for Scheduled Castes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.