निवडणुकीसाठी १,२२५ उमेदवार पात्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:30 IST2021-01-03T04:30:49+5:302021-01-03T04:30:49+5:30

पारडगाव : घनसावंगी तालुक्यातील ६२ ग्रामपंचायतीच्या होऊ घातलेल्या निवडणुकीसंदर्भात छाननी प्रक्रियेत १ हजार २२५ उमेदवार पात्र ठरले. तर ३५ ...

1,225 candidates eligible for election | निवडणुकीसाठी १,२२५ उमेदवार पात्र

निवडणुकीसाठी १,२२५ उमेदवार पात्र

पारडगाव : घनसावंगी तालुक्यातील ६२ ग्रामपंचायतीच्या होऊ घातलेल्या निवडणुकीसंदर्भात छाननी प्रक्रियेत १ हजार २२५ उमेदवार पात्र ठरले. तर ३५ उमेदवारांचे अर्ज अवैध ठरविण्यात आले.

नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या पहिल्या दिवशी (२३ डिसेंबर) रोजी एकही उमेदवाराचे नामनिर्देशन अर्ज आले नव्हते. हे चित्र २४ डिसेंबर रोजीही होते. तर २८ डिसेंबरला ५३ उमेदवारांनी नामनिर्देशन अर्ज भरले. २९ डिसेंबर रोजी ३१८, ३० डिसेंबर १ हजार २५१ उमेदवारांनी नामनिर्देशन अर्ज भरले होते. एकूण १ हजार ६२२ उमेदवारांचे नामनिर्देशन अर्ज आले होते. छाननीच्या दिवशी १ हजार २८५ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले. दरम्यान विविध त्रुटींअभावी ३५ जणांचे अर्ज अवैध ठरविण्यात आले. यात बोधलापुरी १, बोडखा १, रवना १, मांदळा ४, पारडगाव ३, शिंदे वडगाव ४, घोनसी तांडा २, आवलगाव बुद्रूक १, जाम समर्थ २, कंडारी अंबड ४, गुंज बुद्रूक १, खालापुरी २, यावल पिंपरी तांडा १, सरपगव्हाण १, खडकवाडी १, खडका १, घोंसी खुर्द १, बहिरेगाव १, माहेर जवळा १, बोरगाव खुर्द १, निपाणी पिंपळगाव १ या गावाचा समावेश आहे.

अर्ज माघार घेण्याकडे लक्ष

ज्या उमेदवारांना निवडणुकीतून अर्ज मागे घ्यायचा आहे, त्यांना ४ जानेवारी दुपारी तीन वाजेपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहे. यानंतर निवडणूक चिन्हाचे वाटप केले जाणार आहे. त्यामुळे कोण अर्ज मागे घेणार आणि कुणाला कोणते चिन्ह मिळणार याबाबत मतदारांमधून उत्सुकता वाढली आहे.

Web Title: 1,225 candidates eligible for election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.