सातोन्यात आकात गटाला १२ जागा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 04:32 IST2021-01-25T04:32:25+5:302021-01-25T04:32:25+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सातोना (खु) : परतूर तालुक्यातील सातोना (खु) येथे भाजप पुरस्कृत विलास आकात यांच्या गटाने १५ पैकी ...

12 seats for Akat group in Satonya | सातोन्यात आकात गटाला १२ जागा

सातोन्यात आकात गटाला १२ जागा

लोकमत न्यूज नेटवर्क

सातोना (खु) : परतूर तालुक्यातील सातोना (खु) येथे भाजप पुरस्कृत विलास आकात यांच्या गटाने १५ पैकी सर्वाधिक १२ जागा जिंकून आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. तर विद्यमान सरपंच महेशदेवा आकात यांच्या गटाला केवळ तीन जागा मिळाल्या आहेत.

परतूर तालुक्यातील ३८ ग्रामपंचायतींच्या निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीत भाजपप्रणित विलास आकात याचे चिरंजीव रोहन आकात यांचा गावात दांडगा संपर्क असल्यामुळे व राहुल लोणीकर यांच्या मिळालेल्या पाठिंब्यामुळे या निवडणुकीत भाजपला विजय मिळवता आला. याबाबत विलास आकात म्हणाले, विकासाच्या मुद्द्यावर गावातील लोकांनी आमच्यावर टाकलेल्या विश्वासाला मी तडा जाऊ देणार नाही, त्यांचा विश्वास सार्थ ठरवेन. गावातील पाणी, रस्ते आणि नाल्यांचा प्रश्न आम्ही प्राधान्याने मार्गी लावणार आहोत. शासनाच्या विविध योजना गावात आणण्यासाठी प्रयत्नशील राहू, असेही ते म्हणाले.

Web Title: 12 seats for Akat group in Satonya