टेंभुर्णीतील १७ जागांसाठी १०१ जणांचे अर्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2021 04:21 IST2021-01-01T04:21:38+5:302021-01-01T04:21:38+5:30
टेंभुर्णी : जाफराबाद तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या टेंभुर्णी ग्रामपंचायतीच्या १७ जागांसाठी तब्बल १०१ जणांनी आवेदनपत्र भरले आहेत. दरम्यान, ...

टेंभुर्णीतील १७ जागांसाठी १०१ जणांचे अर्ज
टेंभुर्णी : जाफराबाद तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या टेंभुर्णी ग्रामपंचायतीच्या १७ जागांसाठी तब्बल १०१ जणांनी आवेदनपत्र भरले आहेत. दरम्यान, गुरुवारी छाननीच्या दिवशी यातील एकही अर्ज अवैध न ठरल्याने सर्वच्या सर्व १०१ अर्ज वैध ठरल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी नारायण खिल्लारे यांनी सांगितले.
टेंभुर्णी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागलेले असल्याने आता ४ तारखेला उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी नेमके किती जण अर्ज मागे घेतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. दाखल केलेल्या उमेदवारी अर्जात प्रभाग ३ मध्ये दोनच जागा असल्याने सर्वात कमी ८ तर प्रभाग ६ मध्ये सर्वात जास्त २२ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. अन्य प्रभागांमध्ये प्रभाग एक- १९, प्रभाग दोन - १४, प्रभाग तीन- ८, प्रभाग चार- २०, प्रभाग पाच- १८, प्रभाग सहा- २२ याप्रमाणे उमेदवारी अर्ज भरले गेले आहे. आज जरी १७ जागांसाठी १०१ उमेदवारी अर्ज आले असले तरी खऱ्या अर्थाने निवडणुकीच्या आखाड्यात किती जण राहतात, हे ४ तारखेलाच कळणार असल्याने तूर्त तरी अनेक उमेदवार आपल्यासाठी धोकादायक ठरणार. या उमेदवारांची अर्ज मागे घ्यावा म्हणून मनधरणी करताना दिसत आहे.