Zohrab Mamdani: न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2025 09:56 IST2025-11-05T09:55:09+5:302025-11-05T09:56:58+5:30
Zohrab Mamdani Mayor of New York: अपक्ष उमेदवार तथा माजी राज्यपाल अँड्र्यू कुओमो आणि रिपब्लिकन उमेदवार कर्टिस स्लीवा यांचा त्यांनी पराभव केला.

Zohrab Mamdani: न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
अमेरिकेतील न्यूयॉर्क शहराच्या महापौरपदाच्या निवडणुकीत डेमोक्रॅटिक सोशलिस्ट पार्टीचे उमेदवार झोहरान ममदानी यांनी ऐतिहासिक विजय मिळवला आहे. खरेतर, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांचा तीव्र विरोध आणि धमक्यांच्या पार्श्वभूमीवर ममदानी यांचा हा विजय झाला आहे. त्यांन अपक्ष उमेदवार तथा माजी राज्यपाल अँड्र्यू कुओमो आणि रिपब्लिकन उमेदवार कर्टिस स्लीवा यांचा पराभव केला. महत्वाचे म्हणजे, ममदानी हे न्यूयॉर्क शहराचे सर्वात तरुण, भारतीय वंशाचे आणि पहिले मुस्लीम महापौर झाले आहेत.
तब्बल २० लाखांहून अधिक नागरिकांनी बजावला मतदानाचा हक्क -
या निवडणुकीत ममदानी यांचा थेट मुकाबला अँड्र्यू कुओमो यांच्याशी होता. ट्रंप यांच्या कार्यकाळातील पहिली मोठी राजकीय परीक्षा म्हणून या निवडणुकीकडे बघितले जात होते. शहराच्या निवडणूक बोर्डानुसार, तब्बल २० लाखांहून अधिक नागरिकांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. महत्वाचे म्हणजे, १९६९ नंतरची सर्वाधिक मतदानाची नोंद झाली. या शहराची लोकसंख्या सुमारे ८५ लाख एवढी आहे.
कसे आकर्षित झाले तरुण ? -
केवळ ३४ वर्षीय झोहरान ममदानी यांनी, आर्थिक विषमता दूर करण्यासाठी व्यापक बदलाचे समर्थन केले आहे. त्यांच्या धाडसी अजेंड्याने आणि प्रेरणादायी दृष्टीने हजारो तरुण आणि कामगार वर्गाला आकर्षित केले. मदनानी यांचे, वर्मोंटचे सिनेटर बर्नी सँडर्स आणि न्यूयॉर्कच्या प्रतिनिधी अलेक्झांड्रिया ओकासियो-कोर्टेझ यांनीही समर्थन दिले.
“Let’s go NYC” ममदानी यांच्या पत्नी रमा दुवाजी यांची इन्स्टा. पोस्ट -
दरम्यान, ममदानी यांच्या पत्नी रमा दुवाजी यांनी एस्टोरिया, क्वीन्स येथे मतदान करून सोशल मीडियावर एक पोस्ट केली. यातून त्यांनी नागरिकांना मतदानासाठी प्रोत्साहित केले. त्यांनी इन्साग्रामवर “Let’s go NYC.” असे म्हटले आहे.