'माझ्यासोबत शेकडो वेळा रेप करण्यात आला', तरूणीने केला अनेक धक्कादायक घटनांचा खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2022 13:02 IST2022-07-26T13:02:14+5:302022-07-26T13:02:23+5:30
Rape Story : रोज म्हणाली की, 6 वर्ष सेक्ससाठी तिची तस्कीर करण्यात आली. तिला वेल्सच्या टेलफोर्डमध्ये नेण्यात आलं होतं. जिथे दररोज 6 महिने सतत तिचं लैंगिक शोषण करण्यात आलं.

'माझ्यासोबत शेकडो वेळा रेप करण्यात आला', तरूणीने केला अनेक धक्कादायक घटनांचा खुलासा
Rape Story : ब्रिटनच्या वेल्समध्ये राहणाऱ्या एका तरूणीसोबत घडलेल्या वेदनादायी घटनेमुळे लोकांना हैराण केलं आहे. रोज (बदललेलं नाव) म्हणाली की, तिच्यासोबत शेकडो वेळा रेप करण्यात आला आणि बरेच दिवस तिला बंदी बनवून ठेवण्यात आलं.
रोज म्हणाली की, 6 वर्ष सेक्ससाठी तिची तस्कीर करण्यात आली. तिला वेल्सच्या टेलफोर्डमध्ये नेण्यात आलं होतं. जिथे दररोज 6 महिने सतत तिचं लैंगिक शोषण करण्यात आलं. एका रिपोर्टनुसार, गेल्या एक दशकादरम्यान ब्रिटनच्या टेलफोर्डमध्ये एक हजारांपेक्षा जास्त मुलांचं लैंगिक शोषण करण्यात आलं. सेक्स स्कॅंडलबाबत एक चौकशी याच आठवड्यात पूर्ण झाली. या चौकशी दरम्यान रोजने अनेक पुरावेही दिले.
रोजने सांगितलं की, तिच्यासोबत जे काही टेलफोर्डमध्ये झालं ते तर समुद्रात केवळ एका थेंबासारखं होतं. ब्रिटनच्या अनेक भागात सतत तिचं लैंगिक शोषण करण्यात आलं.
रोज म्हणाली की, जेव्हा ती 11 वर्षांची होती तेव्हा शेजाऱ्यांनी तिच्या मार्फत ड्रग्सचा सप्लाय केला होता. यादरम्यान तिनेही अनेकदा ड्रग्सचं सेवन केलं. यामुळे तिला स्कूलमधून काढून टाकण्यात आलं होतं. त्यामुळे तिचं शिक्षण काही काळ घरातच झालं.
रोजचं वय आता 35 वर्षे झालं आहे. तिने 14 व्या वर्षी कॉलेज सुरू केलं होतं. जेव्हा ती कॉलेजमध्ये गेली तेव्हा तिची भेट एंड्रियासोबत (बदललेलं नाव) झाली. क्लास करून रोज एंड्रियाच्या घरी गेली. यानंतर दोघेही Promenade नावाच्या ठिकाणी गेले. जिथे लोक नेहमीच मजा-मस्ती करण्यासाठी जात होते. यादरम्यान एका कारमध्ये तिला आणि तिच्या मैत्रिणीला खेचण्यात आलं. कारमधील लोकांनी रोजसोबत गॅंगरेप केला.
रोजनुसार, तिच्या मैत्रिणीने या घटनेकडे दुर्लक्ष करण्यास सांगितलं. रोज म्हणाली की, यानंतर तिच्यासोबत अनेकदा अशा घटना घडल्या.