तरुण, लठ्ठ लोक हृदयविकाराचे बळी
By Admin | Updated: March 27, 2016 00:14 IST2016-03-27T00:14:08+5:302016-03-27T00:14:08+5:30
धूम्रपान करणारे तरुण हृदयविकाराचे, उच्च रक्तदाबाचे आणि मधुमेहाचे बळी ठरत असल्याचे एका नवीन संशोधनात आढळून आले आहे.

तरुण, लठ्ठ लोक हृदयविकाराचे बळी
वॉशिंग्टन : धूम्रपान करणारे तरुण हृदयविकाराचे, उच्च रक्तदाबाचे आणि मधुमेहाचे बळी ठरत असल्याचे एका नवीन संशोधनात आढळून आले आहे.
यावर संशोधन करणाऱ्या संशोधकांच्या पथकात भारतीय वंशाच्या एका संशोधकाचाही समावेश आहे. या संशोधनात ३,९०० पेक्षा अधिक अशा रुग्णांचा अभ्यास करण्यात आला. या सर्वांना कशामुळे हृदयविकार जडला गेला, त्याची कारणे काय? यावर अभ्यास करण्यात आला. या सर्वांवर १९९५ ते २०१४ या काळात अमेरिकेतील क्विन्सलँड क्लिनिकमध्ये उपचार करण्यात आले होते. त्याच्यावर हृदयविकाराशी संबंधित एसटी-एलिव्हेशन मायोकार्डियल इन्फ्रॅक्शन किवी एसटी सेगमेंट एलिव्हेशन मायोकार्डियल इन्फ्रॅक्शन यासाठी उपचार करण्यात आले होते. या संशोधन पथकाचे प्रमुख व क्वीन्सलँड क्लिनिकचे समीर कपाडिया म्हणाले की, जेव्हा लोक नियमित तपासणीसाठी येतात तेव्हा त्यांना वजन कमी करण्याचा आणि शारीरिक मेहनत करण्याचा सल्ला दिला जातो. एसटीएमआयमध्ये हृदयातील मुख्य धमण्यात अडथळे आल्याने त्या बंद होतात व रक्तपुरवठा थांबतो. त्यातून हृयविकाराचा झटका येतो. हे टाळण्यासाठीच व्यायाम करण्यास सांगितले जाते. (वृत्तसंस्था)