शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडून आलेल्याला २ कोटी मात्र आमदार नसतानाही मला २० कोटी मिळतात; सदा सरवणकरांचं वादग्रस्त विधान
2
पंतप्रधान मोदी आज देशवासियांना संबोधित करणार; पाच वाजता कोणत्या विषयावर बोलणार?
3
स्वप्नातील एसयूव्ही खरेदीची संधी! महिंद्रा स्कॉर्पिओ झाली ₹२.१५ लाखांनी स्वस्त; जाणून घ्या नवीन किंमत
4
Nagpur Crime: घरातून बाहेर पडला अन् कारमध्ये मिळाला व्यावसायिकाचा मृतदेह; मृत्यू की हत्या?
5
युद्ध युरोपच्या दाराशी! रशियन ड्रोनची नाटो देशांच्या हद्दीत घुसखोरी, तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला?
6
नवरात्रीपासून GST चे नवे दर लागू होणार; कोणी टाळाटाळ केल्यास 'इथे' करा तक्रार; हेल्पलाइन नंबर जारी
7
नेपाळचे जेन-झी माजी पंतप्रधान ओलींचा पिच्छा सोडेनात! आता केली 'अशी' मागणी, म्हणाले...
8
पंतप्रधान नरेंद्र मोदींशी पहिली भेट कधी झाली? अमित शाहांनी सांगितला सगळा किस्सा
9
'बगराम हवाई तळ परत करा, अन्यथा परिणाम खूप वाईट होतील'; डोनाल्ड ट्रम्प यांची अफगाणिस्तानला धमकी
10
पत्नीचा 'तो' नातेवाईक पाहून संताप अनावर झाला; चिडलेल्या पतीने चाकूने वार केला! थराराने परिसर हादरला
11
H-1B व्हिसासाठी ८८ लाख रुपये फक्त 'या' लोकांनाच भरावे लागणार; व्हाइट हाउसचे स्पष्टीकरण
12
Poonam Pandey: रामायणात पूनम पांडे रावणाच्या पत्नीच्या भूमिकेत, रामलीला कमिटी म्हणते- "तिला सुधरायचं आहे..."
13
पगार फक्त ५३,०००, तरी ९ वर्षांत झाला करोडपती! कॉर्पोरेट कर्मचाऱ्याने सांगितलं गुंतवणुकीचं गुपित
14
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
15
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
16
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
17
नवरात्रीच्या मराठी शुभेच्छा, Messages,Images, Whatsapp Status ला शेअर करुन करूया जागर शक्तीचा!
18
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
19
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
20
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?

Elon Musk यांचा Amber Heard सोबत लिफ्टमध्येच रोमान्स? Video व्हायरल; नेमका संबंध काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2022 16:15 IST

या प्रकरणात रोजच्या रोज जॉनी आणि एम्बर यांच्या नात्यांशी संबंधित छोट्या मोठ्या धक्कादायक गोष्टीही समोर येत आहेत. विशेष म्हणजे या प्रकरणात बिझनेसमन आणि टेस्लाचे सर्वेसर्वा इलॉन मस्क यांचे नावही वेळोवेळी समोर येत आहे.

जॉनी डेप आणि त्याची एक्स पत्नी एम्बर हर्ड यांच्यात सुरू असलेले न्यायालयीन प्रकरण दिवसेंदिवस वेगळ्याच वळणावर जाताना दिसत आहे. जॉनी आपल्या बाजूने एका पाठोफाठ एक असे जबरदस्त साक्षीदार आणि पुरावे सादर करताना दिसत आहे. तर एम्बर रोजच्या रोज तिच्या वक्तव्यावर यू-टर्न घेताना दिसत आहे. यामुळे हे न्यायालयीन प्रकरण एखाद्या टीव्ही शोपेक्षा कमी नाही.

याशिवाय, या प्रकरणात रोजच्या रोज जॉनी आणि एम्बर यांच्या नात्यांशी संबंधित छोट्या मोठ्या धक्कादायक गोष्टीही समोर येत आहेत. विशेष म्हणजे या प्रकरणात बिझनेसमन आणि टेस्लाचे सर्वेसर्वा इलॉन मस्क यांचे नावही वेळोवेळी समोर येत आहे.

इलॉन मस्क आणि एम्बर हर्ड काही काळ एकमेकांना डेट करत होते. जॉनीने सर्वप्रथम, एम्बर आणि इलॉन यांच्यात अफेअर सुरू असल्याचा आरोप केला होता. आता सोशल मीडियावर या दोघांचा व्हिडिओही व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एम्बर आणि इलॉन हे जॉनी डेपच्या पेंटहाऊसमधील लिफ्टमध्ये अत्यंत रोमॅन्टिक मूडमध्ये दिसत आहेत.

नात्यात होते एम्बर आणि इलॉन - जॉनी डेपला तलाक दिल्यानंतर एम्बर हर्ड आणि इलॉन मस्क यंचे नाते सुरू झाले. वर्षभरानंतर एम्बर, इलॉनपासूनही दूर झाली होती. 2018 मध्ये या दोघांनी पुन्हा एकदा एकमेकांना डेट केले. मात्र, काही महिन्यानंतर ते पुन्हा वेगळे झाले. जॉनी डेपच्या वकिलांनी न्यायालयात व्हिडिओही सादर केला होता. या व्हिडिओंमध्ये एम्बर इलॉनसोबत लेट नाईट 'मिटिंग्स'साठी भेटतांना दिसू शकते. तर जॉनीने आपल्या केसमध्ये, इलॉन सोबत एम्बरचे अफेअर त्यांचे 2015 मध्ये लग्नाच्या एक महिन्यानंतरपासून होते, असा आरोप केला आहे.

24 एप्रिल 2017 रोजी, एम्बर हर्डने इलॉन मस्क सोबतचे आपले संबंध इन्स्टावर सार्वजनिक केले होते. तिने एक फोटो शेअर केला होता. या फोटोत दोघेही रेस्टॉरंटमध्ये एकत्र बसलेले दिसत आहेत. इलॉनच्या गालावर लिपस्टिकदेखील दिसत आहे. या फोटोला अभिनेत्रीने 'Cheeky', असे कॅप्शन दिले होते.

इलॉन यांनी पेज सिक्ससोबत बोलताना एम्बर सोबतच्या आपल्या नात्यावर स्पष्टीकरणही दिले होते. तसेच त्यांनी, यापूर्वी थ्रीसमने केलेले आरोपही फेटाळले होते. यावेळी, 'कारा आणि मी मित्र आहोत. पण आम्ही कधीही इंटिमेट झालेलो नाही. हे मी कन्फर्म करू शकतो. मी पुन्हा कन्फर्म करू इच्छितो, की मी आणि एम्बरने, तलाकचा अर्ज दिल्यानंतर साधारणपणे महिनाभरानंतर डेटिंग सुरू केले होते. त्यांच्या लग्नावेळी आमचा कसलाही संबंध नव्हता.

टॅग्स :elon muskएलन रीव्ह मस्कHollywoodहॉलिवूड