‘तुम्ही चुकीचे आहात, पंतप्रधान मोदी ट्रम्प यांना घाबरत नाहीत...’; अमेरिकन सिंगरने राहुल गांधींना फटकारले
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2025 16:08 IST2025-10-17T16:02:28+5:302025-10-17T16:08:25+5:30
पंतप्रधान मोदींविरुद्ध केलेल्या वक्तव्याबद्दल अमेरिकन गायिका मेरी मिलबेन यांनी राहुल गांधींवर टीका केली आहे. राहुल गांधींमध्ये पंतप्रधान होण्याची पात्रता नाही असे त्यांनी म्हटले आहे.

‘तुम्ही चुकीचे आहात, पंतप्रधान मोदी ट्रम्प यांना घाबरत नाहीत...’; अमेरिकन सिंगरने राहुल गांधींना फटकारले
अमेरिकन गायिका मेरी मिलबेन हिने खासदार राहुल गांधी यांच्यावर टीका केली. पंतप्रधान मोदींविरुद्धच्या काही दिवसापूर्वी केलेल्या वक्तव्याबद्दल या गायिकेने राहुल गांधींवर निशाणा साधला. त्या गायिकेने राहुल गांधी यांच्याकडे पंतप्रधान होण्याची पात्रता नसल्याचेही म्हटले आहे.
राहुल गांधी यांनी एका पोस्टमध्ये पंतप्रधान मोदी ट्रम्प यांना घाबरत असल्याचा आरोप केल्यानंतर अमेरिकन गायिका मेरी मिलबेन हिची ही टिप्पणी आली आहे. पंतप्रधान मोदी अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांना भारत रशियन तेल खरेदी करणार नाही हे ठरवण्याची आणि जाहीर करण्याची परवानगी देतात, असा आरोप राहुल गांधींनी केला होता.
राहुल गांधी यांच्यावर अमेरिकन सिंगरने टीका काय केली?
राहुल गांधींच्या पंतप्रधान मोदींबद्दलच्या पोस्टबद्दल, अमेरिकन सिंगरने म्हटले, "राहुल गांधी, तुम्ही चुकीचे आहात. पंतप्रधान मोदी राष्ट्राध्यक्ष ट्रम्पला घाबरत नाहीत. पंतप्रधान मोदी दीर्घकालीन रणनीती समजतात आणि अमेरिकेसोबत त्यांची राजनैतिक रणनीती आहे. ज्याप्रमाणे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प नेहमीच अमेरिकेचे हित प्रथम ठेवतात, त्याचप्रमाणे पंतप्रधान मोदी देखील देशाला प्रथम ठेवतात. पंतप्रधान मोदी भारतासाठी जे सर्वोत्तम आहे ते करतील. मी त्यांचे कौतुक करतो, असंही सिंगरने म्हटले आहे.
'पंतप्रधान मोदी आणि राष्ट्राध्यक्ष ट्रम्प नेहमीच त्यांच्या देशासाठी जे योग्य आहे ते करतात. राहुल गांधींना हे कधीच समजेल अशी अपेक्षा नाही. "मी तुम्हाला अशा प्रकारचे नेतृत्व समजून घेण्याची अपेक्षा करत नाही कारण तुमच्याकडे भारताचे पंतप्रधान होण्याचे कौशल्य नाही, असेही पोस्टमध्ये अमेरिकन गायिकेने म्हटले आहे.
मिलबेन अनेकदा पंतप्रधान मोदींचे कौतुक करतात
अमेरिकन गायिका मिलबेन पंतप्रधान मोदींच्या चाहत्या आहेत. त्या एक कलाकार आणि सांस्कृतिक राजदूत दोन्ही आहेत. जून २०२३ मध्ये पंतप्रधान मोदींच्या अमेरिका भेटीदरम्यान ती त्यांना भेटली. त्या भेटीदरम्यान त्यांनी रोनाल्ड रेगन भवनमध्ये भारतीय राष्ट्रगीत गायले. त्यानंतर त्यांनी पंतप्रधान मोदींचे पाय स्पर्श केले आणि त्यांचे आशीर्वाद घेतले.
You are wrong, @RahulGandhi.
PM @narendramodi is not afraid of President Trump. PM Modi understands the long game and his diplomacy with the U.S. is strategic. Just as @POTUS will always put America’s interests first, so will PM Modi do what is best for India. And I applaud that.… https://t.co/4p0HNRCAv2— Mary Millben (@MaryMillben) October 17, 2025