व्हाईट हाऊसच्या ‘ईस्टर एग’मध्ये होणार योग सत्र
By Admin | Updated: March 27, 2016 00:08 IST2016-03-27T00:08:12+5:302016-03-27T00:08:12+5:30
व्हाईट हाऊसच्या हिरवळीवर सोमवारी होणाऱ्या ईस्टर एग सोहळ्यादरम्यान हजारो अमेरिकींना योग करण्याची संधी मिळणार असून, योग प्रशिक्षक त्यांना योगाचे धडे देणार आहेत.

व्हाईट हाऊसच्या ‘ईस्टर एग’मध्ये होणार योग सत्र
वॉशिंग्टन : व्हाईट हाऊसच्या हिरवळीवर सोमवारी होणाऱ्या ईस्टर एग सोहळ्यादरम्यान हजारो अमेरिकींना योग करण्याची संधी मिळणार असून, योग प्रशिक्षक त्यांना योगाचे धडे देणार आहेत.
ओबामांचा व्हाईट हाऊसमधील हा शेवटचा ईस्टर एग उत्सव आहे. ईस्टर एग सोहळ्याच्या आयोजनासाठी व्हाईट हाऊसच्या विस्तीर्ण हिरवळीचे १० वेगवेगळे विभाग करण्यात आले असून, त्यातील एक विभागाचे योग गार्डन असे नामकरण करण्यात आले आहे. (वृत्तसंस्था)