वेळ घालवण्यासाठी प्रवाशाने केली योगासने
By Admin | Updated: April 5, 2017 05:06 IST2017-04-05T05:06:24+5:302017-04-05T05:06:24+5:30
रेल्वे प्रवास बहुतेक वेळा उबग आणणारा व शरीर थकवून टाकणारा असतो.

वेळ घालवण्यासाठी प्रवाशाने केली योगासने
लंडन : रेल्वे प्रवास बहुतेक वेळा उबग आणणारा व शरीर थकवून टाकणारा असतो. हे टाळण्यासाठी अनेक प्रवासी वर्तमानपत्रे वाचतात, गप्पा मारतात, संगीत ऐकतात. परंतु एका प्रवाशाने काही दिवसांपूर्वी थकवा दूर करण्यासाठी वेगळीच उपाययोजना केली. त्याने डब्यात चटई टाकली, कानात ईअरफोन लावले आणि योगासने सुरू केली. हा प्रवासी आपल्याच नादात होता. त्याला पाहून इतर प्रवासी थक्क झाले. लंडन ते युस्टन या २० मिनिटांच्या प्रवासात त्याने किती तरी आसने केली. या दरम्यान या डब्यातून दुसऱ्या डब्यात लोकांना त्याला ओलांडून जावे लागले. परंतु त्याला त्याची जाणीवही नव्हती, एवढा तो त्यात एकाग्र झाला होता. डब्यातील इतर प्रवाशांनी या योगासने करणाऱ्या प्रवाशाची छायाचित्रे काढून इंटरनेटवर टाकली. या प्रवाशाची सध्या जोरदार चर्चा होत आहे.